बेळगाव शहरातील त्या चर्चित वाईन शाॅपजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

बेळगाव शहरातील त्या चर्चित वाईन शाॅपजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील कसाई गल्लीतील त्या वाईन शाॅपजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे कसाईच्या गल्लीभोवती चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (17 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कसाई गल्ली वाईन शॉपजवळ हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत व्यक्ती अंदाजे 45 वर्षांचा माणूस आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.
या वाईन शॉपला बंद करा, अशी मागणी काल बुधवारी कसाई गल्लीतील स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. हे वाईन शॉप बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आज अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने स्थानिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. याबाबत मार्केट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिस मृताची अधिक माहिती आणि तपासणी करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील त्या चर्चित वाईन शाॅपजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm