भीषण! मध्य प्रदेश | 54 प्रवाशांनी खच्चून भरलेली बस कालव्यात कोसळली, 35 मृतदेह हाती

भीषण! मध्य प्रदेश | 54 प्रवाशांनी खच्चून भरलेली बस कालव्यात कोसळली, 35 मृतदेह हाती

belgavkar.com | belgaum | belgavkar

मध्यप्रदेशात सीधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं समोर येतंय. मंगळवारी (16 फेब्रुवारी) सकाळी सीधी सतनाकडे निघालेली एक बस कोलव्यात कोसळून हा अपघात झाला. या बसमधून जवळपास 54 प्रवासी प्रवास करत होते. या दुःखद घटनेनं संपूर्ण मध्यप्रदेशला हादरवून टाकलंय. दुर्घटनेनंतर जवळपास 7 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आत्तापर्यंत 35 मृतदेह हाती लागले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे. हा कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसत आहे. क्रेनच्या मदतीनं ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
इथे मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत. बस दुर्घटनेसंबंधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केलीय. 'कालवा बराच खोल आहे. आम्ही तातडीनं धरणाचं पाणी थांबवण्याचे आदेश दिले तसंच मदत आणि बचाव पथकांना रवाना करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी, एसपी आणि एसडीआरएफ पथकं मदतीसाठी हजर आहेत. बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मदत आणि बचाव कार्यात सहभागी टीमच्या संपर्कात आहे. 7 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलीय. हा अपघात रीवा-सीधी सीमेजवळ छुहियाघाटानजिक घडला. बाणसागर प्रकल्पाच्या कालव्यात ही बस कोसळलीय. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीआरएफची मदत घेण्यात येतेय.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भीषण! मध्य प्रदेश | 54 प्रवाशांनी खच्चून भरलेली बस कालव्यात कोसळली, 35 मृतदेह हाती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm