बेळगाव : स्वखर्चातून गोगटे सर्कलचा विकास

बेळगाव : स्वखर्चातून गोगटे सर्कलचा विकास

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव गोगटे सर्कलचा विकास करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी येथील उद्योजक शिरीष गोगटे यांनी मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, सर्कलमध्ये पोलिस बुथ उभारण्याची तसेच सुशोभिकरणाची गरज आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल. याबाबत विकास आराखडाही तयार असून याची सविस्तर माहिती गोगटे यांनी आयुक्तांना दिली. या उपक्रमाला पोलिस आयुक्तांची परवानगी मिळाली असून मनपाचीही परवानगी मिळावी असे त्यांनी सांगितले.
गोगटे सर्कलचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आराखडा तयार केला आहे. सौंदर्गीकरणाचा हा प्रकल्प स्वखर्चातून राबविणार आहोत. त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. गोगटे सर्कलच्या मध्यभागी पोलिस बूथ आणि सर्कलचे सौंदर्गीकरण करण्याचा आराखडा तयार केला आहे. गोगटे सर्कलजवळील रस्त्याचे व्हाईट टॉपिंग झाले आहे. मात्र, सर्कलचा विकास करणे गरजेचे आहे. ऊन, पाऊस आणि अपघातांपासून संरक्षण मिळावे यासाठी सर्कलच्या मधोमध वाहतूक पोलिसांसाठी बूथ उभारला जाईल.
वाहतुकीला कोणताही अडथळा न आणता सौंदर्गीकरण केले जाईल. चारी बाजूला रिफ्लेक्टर्स, वाहतूक सूचना फलक उभारले जातील. फुलझाडांच्या कुंड्या व अन्य विकास करुन सौंदर्यांकरण केले जाईल. यामुळे परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले. त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मार्ग संस्थेचे पीआरओ विकास कलघटगी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : स्वखर्चातून गोगटे सर्कलचा विकास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm