बेळगाव : कणबर्गी येथे सुशोभित करण्यात आलेल्या तलावाचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते उदघाटन झाले. गेल्या दोन वर्षांपासून कणबर्गी येथील सिद्धेश्वर तलावाचे सौंदर्याकरण करण्यात येत आहे. आमदार बेनके म्हणाले, या तलावासाठी 5 कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
कणबर्गी परिसराच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असून हा परिसर राज्यात आदर्श करु. स्मार्ट सिटीतून आवश्यक विकासकामे करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे. यावेळी स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर, मनपा आयुक्त के. एच. जगदीश आदी उपस्थित होते.