किल्ले कलानिधीगडवरील लुप्त पावलेल्या पायऱ्या पुन्हा सुस्थितीत... दुर्गवीर प्रतिष्ठान

किल्ले कलानिधीगडवरील लुप्त पावलेल्या पायऱ्या पुन्हा सुस्थितीत... दुर्गवीर प्रतिष्ठान

belgavkar.com | belgaum | belgavkar

24 जानेवारी 2021 रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे कलानिधीगड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे झालेल्या मोहिमेत गणेश दरवाजा आणि चौकीला लागून असलेल्या तटबंदी जवळ दुर्गवीरांनी श्रमदान करून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या पायऱ्यांना पुन्हा मोकळा श्वास दिला. गेली 6 वर्ष सातत्याने बेळगाव, चंदगडसह ईतर तालुक्यातील दुर्गवीर या किल्ल्यावर श्रमदानच कार्य करत आहेत. आणि या 6 वर्षात बरेचशे गडाचे अवशेष, तोफा, शौचकूप शोधून काढण्याचं कार्य दुर्गवीरांनी केलेलं आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीनं यंदा अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे. देशभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रेशन होत असतानाच किल्ले कलानिधी गडावर देखील अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यंदा कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील गडावरील शिवकालीन वस्तूंची स्वच्छता, गडाबाबत आणि दिशादर्शक फलक बसवण्यात आले. दुर्गवीरच्या शिलेदारांनी अतिशय मेहनत आणि जिद्दीने माहिती फलक उभे केले आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी सूचना व महिती फलक लावण्यात आले आहेत. आपला अमूल्य वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून हे दुर्गवीर गडाचे संवर्धन करतात.

सातत्याने होणाऱ्या मोहिमेत ज्या शिवभक्तांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी दुर्गवीर प्रतिष्ठानशी संपर्क करावा.
संपर्क : दुर्गवीर प्रतिष्ठान कलानिधीगड | सेवेचे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर
9740103131-अभिजीत अष्टेकर (बेळगाव)
9845222126- संजय गावडोजी (बेळगाव)
9591447213- सागर मुतकेकर (बेळगाव)
9870101231-संदीप गावडे (चंदगड)
9011376230-अजित पाटील(चंदगड)
दुर्गवीर प्रतिष्ठान www.durgveer.com
बेळगाव, चंदगड, संकेश्वर, गडहिंग्लज, कोल्हापूर

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

किल्ले कलानिधीगडवरील लुप्त पावलेल्या पायऱ्या पुन्हा सुस्थितीत... दुर्गवीर प्रतिष्ठान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm