बेळगाव : उधारी आणि सांऊड सिस्टिमला विरोध केल्यामुळे खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

बेळगाव : उधारी आणि सांऊड सिस्टिमला विरोध केल्यामुळे खून;
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : उधारी देण्यासाठी नकाराचा राग आणि सांऊड सिस्टिमला आक्षेप घेतल्यावरून झालेल्या खून खटल्यातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली. यल्लाप्पा मारुती धामणेकर (वय 24, रा. मास्कोनट्टी, ता. बेळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तर महादेव मिनाजी मेलगे (वय 42, रा. मास्कोनट्टी, बेळगाव) याचा हल्ल्यात खून झाल्याची घटना 11 नोव्हेंबर 2018 रोजी घडली होती. आरोपी धामणेकर व मयत मेलगेमध्ये वाद होता. मेलगे यांचे किराणा दुकान होते. तेथून धामणेकरने उधार वस्तू घेतल्या होत्या. परंतु, पैसे दिले नसल्याने मेलगे यांनी उधारी देणे थांबविले होते. त्यामुळे धामणेकरचा मेलगेवर राग होता.
तसेच धामणेकरने 11 नोव्हेंबर 2018 रोजी साऊंड सिस्टीम लावले होते. मेलगे यांनी त्याला दुकानात महिला येत असतात. थोडे पुढे जाऊन साऊंड सिस्टीम लाव, असे सांगितले. पण, त्याचा धामणेकरला राग आला आणि त्याने 'तुझे खूपच धाडस वाढले आहे. किराणा साहित्य उधार देत नाहीस. रस्त्यावर नाचतोय. त्यालाही आक्षेप घेत आहेस. थांब तुला सोडत नाही, जिवे मारतो', असे म्हणत सायंकाळी 5.30 च्या सुमारास डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात मेलगे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अखेर 13 नोव्हेंबर 2018 मध्ये मृत्यू झाला. यासंदर्भात महादेव मेलगे यांचा भाऊ गंगाराम मेलगे यांनी फिर्याद दिली. धामणेकरविरुध्द गुन्हा दाखल झाला.
पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसूर चौकशी केली. दोषारोपपत्र दाखल केले. या दाव्याची अंतिम सुनावणी द्वितीय जिल्हा आणि सत्र न्यायालयात झाली. यामध्ये आरोपी धामणेकरला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठाविला. दंड न भरल्यास 1 महिन्याची कठीण शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश बजाविला. या प्रकरणी 16 साक्षी, 30 कागदपत्रे आणि 6 मुद्देमाल सरकारी वकिलांतर्फे सादर केले. याप्रकरणी सरकारी वकील जी. के. माहूरकर यांनी काम पाहिले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : उधारी आणि सांऊड सिस्टिमला विरोध केल्यामुळे खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm