चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार;
केंद्रानं दिली परवानगी

belgavkar.com | belgaum | belgavkar

माहिती आणि प्रसारण मंत्रालय जाहीर करणार एसओपी

कोरोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी विविध बाबींवर घालण्यात आलेले निर्बंध आता कमी केले जात आहेत. दरम्यान, यापूर्वीच चित्रपटगृह आणि जलतरण तलाव मर्यादीत स्वरुपात खुले करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे आता अधिक क्षमतेने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत एसओपी जाहीर करण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाने नवी एसओपी जाहीर करत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले की, निरिक्षण, कंटेन्मेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे निर्देश 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत. त्याचबरोबर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कन्टेंमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना राज्यांच्या एसओपींप्रमाणे परवानगी दिली जाईल.
राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज नाही. तसेच आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
Union Home Ministry issues an order to enforce guidelines for surveillance, containment & caution which will be effective from Feb 1 to Feb 28; states/UTs mandated to continue to enforce containment measures & SOPs on various activities & COVID appropriate behaviour.
Cinema halls and theatres have already been permitted upto 50% of seating capacity. Now they will be permitted to operate at higher seating capacity, for which a revised SOP will be issued by Ministry of Information & Broadcasting: Union Home Ministry

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल जास्त क्षमतेनं वापरता येणार; केंद्रानं दिली परवानगी
माहिती आणि प्रसारण मंत्रालय जाहीर करणार एसओपी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm