VIDEO | लालकिल्ल्यावरुन जवान आणि पोलिसांच्या उड्या;

VIDEO | लालकिल्ल्यावरुन जवान आणि पोलिसांच्या उड्या;

belgavkar.com | belgaum | belgavkar

दिल्लीतल्या आंदोलनाचा हिंसक चेहरा कॅमेऱ्यात कैद

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय घेतला. परेड निघाली, पण शांततापूर्ण मार्गाचा कुठेही अवलंब केला गेला नाही. कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. परंतु आंदोलक नियोजित मार्गावरुन हटले आणि ही रॅली हिंसक बनली. परिणामी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, लाठीमार करावा लागला.
Red Fort वर पोलीस व जवानांवर भीषण हल्ल्याचा Live Video; बचावासाठी टाकल्या उड्या
आज सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. दरम्यान या रॅलीला हिंसक वळण लागलं. दिल्लीत पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि शेतकऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. दगडफेक, धक्काबुक्की असंच एकंदर चित्र या रॅलीदरम्यान पाहायला मिळालं. यामध्ये अनेक जवान आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान लाल किल्ल्यातील एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ (Live Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ते पोलीस कर्मचारी आणि जवानांवर हल्ला करीत असल्याचं दिसत आहे.
लाल किल्ल्यावरील या व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ते काठ्या घेऊन पोलीस कर्मचारी व जवानांवर हल्ला करीत आहे. त्या जमावापासून बचाव करण्यासाठी पोलीस व जवानांनी आडव्या बाबूंवरुन खाली उड्या घेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याशिवाय संपूर्ण भागात गदारोळ माजला आहे. गेटजवळ जवान व पोलीस जमा झाल्याचं दिसत आहे. मोठ्या जमावापासून बचाव करण्यासाठी काही जवान बाहेरच्या बाजूच्या भिंतीवर लटकत असल्याचं दिसत आहे. अनेक जणांनी वरुन उड्या टाकल्या आहेत. यामध्ये काही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा अत्यंत भयंकर व्हिडीओ समोर आला आहे.
जेव्हा आंदोलक शेतकऱ्यांनी सीमा पार करुन आतमध्ये प्रवेश केला, तेव्हा शेतकऱ्यांकडून लाल किल्ल्याकडे पोहोचण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. लाल किल्ल्याजवळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडकवण्यासाठी बैरिकेट लावले होते.मात्र, दिल्लीच्या सीमेपासून लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या आंदोलनकर्त्यांसमोर हे बॅरिकेडही टिकले नाहीत. आंदोलनकर्त्यांनी बैरिकेट तोडून लाल किल्ल्याकडे कूच केली. इतके प्रयत्न करुनही दिल्ली पोलीस शेतकऱ्यांना लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन येण्यापासून थांबवू शकले नाहीत. अनेक आंदोलक ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या या ट्रॅक्टर रॅलीला आक्रमक रूप आल्याचे पाहायला मिळालं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली एनसीआर भागातील सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक आणि नांगलोई भागात इंटरनेट सेवा सध्या तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

VIDEO | लालकिल्ल्यावरुन जवान आणि पोलिसांच्या उड्या;
दिल्लीतल्या आंदोलनाचा हिंसक चेहरा कॅमेऱ्यात कैद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm