सौरव गांगुली दादाची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

सौरव गांगुली दादाची तब्येत पुन्हा बिघडली;
छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोलकाता : बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. दादा सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे, असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सौरव गांगुली दादाची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm