बेळगाव : 49 जिलेटिन स्फोटक कांड्या जप्त; एकाला अटक

बेळगाव : 49 जिलेटिन स्फोटक कांड्या जप्त;
एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

शिमोगा स्फोटानंतर सुरक्षेबाबत कडक कारवाई...

बेळगाव : गोकाक तालुक्यात 49 जिलेटिन स्फोटक कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गोकाक तालुक्यातील मन्निकेरी रामेश्वर कालव्याजवळ हे स्फोटके पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. रायबाग तालुक्यातील विठोबा यमनप्पा हळबर याने ट्रॅक्टरमध्ये हा साठा ठेवला होता. त्याच्याकडे 23 ईडी केबल आणि स्फोटक चार्जर बॅटरी देखील होती. त्याचे मूल्य 2,03,500 रुपये आहे.
शिमोगा येथे झालेल्या स्फोटात 6 जणाचा मृत्यू झाला आहे. त्या स्फोटानंतर सुरक्षेबाबत कडक कारवाई बेळगाव जिल्ह्यात सुरु झाली आहे. स्फोटक पदार्थांचा साठा करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक शिवानंद अंबिगेर यांनी केले. या कारवाईत प्रशांत हिरेमठ, फखरुद्दीन नायडू, लोहित अरेंन्नावर व आदि सहभागी होते. अंतर्गत सुरक्षा विभागाचे उत्तर विभागाचे डीवायएसपी अनिलकुमार भूमरेड्डी यांनी ही माहिती दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 49 जिलेटिन स्फोटक कांड्या जप्त; एकाला अटक
शिमोगा स्फोटानंतर सुरक्षेबाबत कडक कारवाई...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm