'एलएसडी'चा धोका! तर पालकांनो, सावधान! काय आहे पेपर बॉम्ब?

'एलएसडी'चा धोका! तर पालकांनो, सावधान! काय आहे पेपर बॉम्ब?

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुलाच्या हातात प्राणी-पक्ष्यांच्या चित्रांचे रंगीत पेपर दिसत असेल, तर पालकांनो, सावधान! कारण अशाच रंगीबेरंगी चित्रांच्या वेष्टनातून एलएसडी नावाच्या अमली पदार्थाची जोरदार विक्री सध्या होऊ लागली आहे. भारतात अनेक तरुण, किशोरवयीनांना एलएसडी विकल्याचे उघड झाले आहे. गोवा कनेक्शन : हे एलएसडी पेपर विदेशात मिळतात. मात्र अनेक विदेशी पर्यटक हे गोवा येथे छुप्या पद्धतीने अमली पदार्थ विक्रीसाठी येतात. एलएसडी पेपर गोवा येथूनच आणत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
एलएसडी काय? : ‘एलएसडी’ हा एक छोटासा कागदी तुकडा असतो. त्यावर पक्षी-प्राण्यांची चित्रे असतात. या कागदावर ‘लेसरजीक अ‍ॅसिड डा एथिल अमाईड’ हे अमली द्रव शिंपडण्यात येते. त्यानंतर या पेपरवरील दोन ते तीन इंच कागदी तुकडादेखील 5 हजार रुपयांना विकला जातो. या कागदाच्या खरेदीसाठी नशेबाज सुपरमॅन, बॅटमॅनसारखे परवलीचे शब्द वापरतात. या कागदाला जिभेवर ठेवल्यानंतर तब्बल 10 ते 12 तासांची झिंग मिळते.
Lysergic acid diethylamide (LSD), or acid as it's commonly known, is a potent, long-lasting psychoactive drug
एलएसडी पेपर हा अमली पदार्थाचा आणखी एक प्रकार. 'पेपर बॉम्ब' हे कागदासारखं दिसणारं, पण अत्यंत घातक असं ड्रग्ज आहे.
काय आहे पेपर बॉम्ब? : पेपर बॉम्ब अर्थात एलएसडी पेपर. ड्रग्ज मार्केटमध्ये सर्वात आधुनिक आणि महाग म्हणून त्याची ओळख आहे. पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक - स्पाईडरमॅन, आय - 25 अशा विविध कोडवर्डने ड्रग्ज मार्केटमध्ये एलएसडी पेपर ओळखला जातो. हे ड्रग्ज पावडर, टॅबलेट आणि लिक्वीड अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे. मात्र तरुणाईकडून या ड्रग्सच्या पेपर प्रकाराला जास्त मागणी असते. या पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळू लागतो आणि नशा होते. त्यामुळे सुपरहिरो असल्याचा भास होऊन नशा करणाऱ्या व्यक्तीला आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, किंवा समुद्रात कितीही किलोमीटर अंतर पोहून पार करु शकतो, असा आभास होतो. पेपर बॉम्ब या ड्रग्जने ब्राझील, ऑस्ट्रेलिया, युरोप या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. परदेशात या ड्रग्जवर कडक निर्बंध असल्याने त्याने आता भारतात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'एलएसडी'चा धोका! तर पालकांनो, सावधान! काय आहे पेपर बॉम्ब?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm