बेळगाव : खानापूराला मिळाली शववाहिका;

बेळगाव : खानापूराला मिळाली शववाहिका;

belgavkar.com | belgaum | belgavkar

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही रोज रात्रीचे जेवण मोफत Help for Needy

बेळगाव ता. खानापूर : शववाहिकेच्या अभावामुळे रात्री - अपरात्री दवाखान्यातून मृतदेह घरी नेताना खानापूर तालुक्यातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अपघात व इतर अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणादरम्यान मृतदेहाची शवचिकित्सा करणे बंधनकारक असते. अशाप्रसंगी शवचिकित्सेनंतर मृतदेह घरी नेताना नातेवाईकांना वाहन शोधताना नाकीनऊ येत होते. त्याचबरोबर बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारावेळी देखील अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या ओळखून बेळगाव येथील सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन संचलित हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या वतीने खानापूर तालुक्यासाठी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज सोमवारी या शववाहीकेचे लोकार्पण केले जाणार आहे. हेल्प फॉर नीडीचे संचालक सुरेंद्र अंगोळकर व खानापूरचे सामाजिक कार्यकर्ते विवेक गिरी यांनी याप्रश्नी पुढाकार घेतला असून खानापूर सरकारी इस्पितळातील रुग्ण व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना रोज रात्रीचे जेवण मोफत देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचेही सोमवारी उदघाटन होणार आहे. गरजूंना या शववाहिकेची गरज बसल्यास सुरेंद्र अनगोळकर 8618993767, विवेक गिरी 8277224321 या क्रमांकावर संपर्क साधून मोफत सुविधा घेता येणार आहे. हेल्प फॉर नीडीने 197 हून अधिक मृतदेहांवर संबंधितांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. त्याचबरोबर सरकारी शाळांमधील मुलांना मोफता शिकवणी, गरजवंतांना मोफत गॅस सिलेंडर व अन्य सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूराला मिळाली शववाहिका;
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही रोज रात्रीचे जेवण मोफत Help for Needy

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm