बेळगाव : राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार; बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक
बेळगाव जिल्हा सरचिटणीस अमोल किरण देसाई

बेळगाव : राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार;
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशभरात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून यासंदर्भात जिल्हधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. आगामी बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार असल्याचे प्रदेश प्रवक्ते मुनीर लतीफ यांनी सांगितले. येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जोतिबा पाटील, रामकृष्ण सांबरेकर, ए. के. पाटील आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. या आंदोलनाचा राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. आगामी बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून यासाठी अमोल देसाईच्या यांच्या नावाची शिफारस आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. याला त्यांनी मंजुरी दिल्यास आम्ही सहकारी लतीफ पक्षाच्या सहकार्याने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहोत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रलंबित आहे. तारीख जाहीर झाली नसली तरी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (Nationalist Congress Party - NCP) बेळगाव जिल्हा सरचिटणीस अमोल किरण देसाई यांची लोकसभा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभेसाठी काँग्रेस व भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने प्रभावी उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याने भाजपनेही कंबर कसली आहे. तर महाराष्र्ट एकीकरण समितीने त्यांचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार; बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm