बेळगाव : झालेला गोळीबार केवळ तीन मिनिटात; अद्याप धागेदोरे सापडले नाहीत.

बेळगाव : झालेला गोळीबार केवळ तीन मिनिटात;
अद्याप धागेदोरे सापडले नाहीत.

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरात हवेत गोळीबार करत तिघा संशयित दरोडेखोरांचा स्टेशनरी दुकानात दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. लुटमारीसाठी मठ गल्ली येथील एका दुकानदारावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला 60 तास उलटले तरी अद्याप धागेदोरे सापडले नाहीत. केवळ तीन मिनिटात हा सारा प्रकार घडला असून गुन्हेगार पल्सर दुचाकीवरून आले होते, अशी माहिती मिळाली आहे. मार्केट पोलीस त्या त्रिकुटाच्या शोधात आहेत. मठ गल्ली येथील चेतना स्टेशनरी मार्ट या दुकानात शुक्रवारी रात्री 9.43 ते 9.46 या तीन मिनिटात गोळीबार व दुकानदारावर हल्ल्याची घटना घडली आहे. राकेश रूपचंद जैन (वय 46, रा. समाचार भवन, नरगुंदकर भावे चौक) या दुकान मालकावर पिस्तुलच्या दस्त्याने हल्ला करण्यात आला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून फुटेजवरून एकूण तिघा जणांनी हे कृत्य केले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत ही घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहिती : राकेश जैन यांचे मठ गल्ली येथे चेतना स्टेशनरी मार्ट नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दिवसभर दुकान सुरू होते. ही घटना घडली त्यावेळी दुकानात एकूण पाच जण होते. एकटा मोटारसायकलवरच बसून होता तर आणखी दोघे दुकानात शिरले होते. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत. प्रत्यक्षात शुक्रवारी रात्री ही घटना घडली असली तरी पोलिसांना शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे. पोलिसांना उशिरा माहिती का दिली..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तिघांपैकी दोघेजण खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले, तर एकटा दुचाकीवरच थांबला होता. खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोघांनी जैन यांच्याकडे बिस्कीट आणि इनो पाकीट देण्याची मागणी केली. दुकानात लुटमारीसाठी शिरलेले तरुण 25 ते 30 वयोगटातील होते. ते मारवाडी भाषेत बोलत होते. जैन यांनी साहित्य दिल्यानंतर बिल देण्याची मागणी केली. त्यावेळी दोघेही बिल देण्याचा बनाव करत अचानकपणे दुकानात शिरले व त्यांनी आपल्याकडे असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दुकान मालक जैन यांच्यासह कर्मचार्‍यांची देखील घाबरगुंडी उडाली. संशयित पैसे लुटण्यासाठी दुकानातील कॅश काउंटरकडे जात असताना जैन यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी पिस्तूलच्या उलट्या बाजूने जैन यांच्या डोक्यात वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. दुकानमालक राकेश यांच्यावर पिस्तुलच्या दस्त्याने हल्ला केल्यानंतर एका कामगाराने गुन्हेगारांवर साबणाचे बॉक्स फेकले. त्यामुळे तो खाली पडला होता, अशी माहिती मिळाली आहे.
त्यामुळे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या संशयितांनी काळोखाचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यानंतर जखमी जैन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुकानदार व त्यांच्या कामगारांनी प्रतिकार केला आहे. थोडा प्रतिकार वाढवला असता तर एखादा गुन्हेगार सापडला असता. कारण दुकानात शिरल्यानंतर दोघा जणांनी शटर खाली ओढून घेतले होते. त्यानंतरच पैसा निकालो, असे सांगत पिस्तूल दाखविण्यात आले आहे. प्रतिकार करताच गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमागे नेमके कोणते गुन्हेगार कार्यरत आहेत, याचा तपास करण्यात येत आहे. मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पिस्तूल की कट्टा...?
गोळीबारासाठी कोणत्या शस्त्राचा वापर करण्यात आला, याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून फुटेजमध्ये सारा प्रकार कैद झाला आहे. घटनास्थळावरुन एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली असून गोळीबारासाठी गुन्हेगारांनी गावठी पिस्तूल की कट्टा याचा तपास करण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : झालेला गोळीबार केवळ तीन मिनिटात; अद्याप धागेदोरे सापडले नाहीत.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm