बेळगाव : व्हॅक्सीन डेपोत एव्हीएशन गॅलरी आणि आर्ट गॅलरी

बेळगाव : व्हॅक्सीन डेपोत एव्हीएशन गॅलरी आणि आर्ट गॅलरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून व्हॅक्सीन डेपोत सिव्हील एव्हीएशन गॅलरी आणि अत्याधुनिक आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. या कामाला प्रारंभ करण्यात आला. आमदार अभय पाटील यांनी व्हॅक्सीन डेपोतील सिव्हिल एव्हीएशन गॅलरी आणि आर्ट गॅलरीच्या कामाला चालना दिली. यावेळी त्यांनी या दोन्ही कामांमुळे बेळगावच्या वैभवात भर पडेल. मुलांना विमान तंत्रज्ञानासह इतर माहिती उपलब्ध होईल, त्याचा फायदा त्यांच्या करियरमध्ये होईल, अशी माहिती दिली.
राज्यातील पहिली एव्हीएशन गॅलरी बेळगावात होणार असून, यासाठी 8 कोटी, तर 6 कोटीतून आर्ट गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. एव्हीएशन गॅलरीमुळे विद्यार्थ्यांत एरोस्पेसबाबत आवड निर्माण होण्याबरोबरच तांत्रिक ज्ञानवृद्धीसाठी उपयोगी ठरेल. विमानाचे तंत्रज्ञान, विमानांचा इतिहास आणि माहिती मिळणार आहे. नागरी विमानांसह लष्करी विमानांचे मॉडेल प्रदर्शन गॅलरीत भरविण्यात येईल. सिमिलेटर (4) आणून मुलांना वैमानिक होण्याचा अनुभव घेता येईल.
बेळगावातील अनेक कलाकारांची व्हॅक्सीन डेपोमधील अत्याधुनिक आर्ट गॅलरीमुळे त्यांची इच्छा पूर्ण होणार असल्याचे यावेळी आमदार अभय पाटील यांनी सांगितले. या दोन्ही गॅलरीच्या निर्माणामुळे पर्यटन वाढीला मदत मिळणार असून शेजारील गोवा तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षित करता येणार असल्याचा विश्वास आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला. या दोन्ही कामांमुळे बेळगावच्या पर्यटनालाही चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास स्मार्ट सिटी योजना व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट सिटी योजनेचे अभियंते व इतर कर्मचारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : व्हॅक्सीन डेपोत एव्हीएशन गॅलरी आणि आर्ट गॅलरी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm