सावकारांच्या कर्जामुळे सांगलीत संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; 14 जणांवर सावकारीचा गुन्हा

सावकारांच्या कर्जामुळे सांगलीत संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या;
14 जणांवर सावकारीचा गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

सांगली, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश

सांगली : कर्जाला कंटाळून मिरजेच्या बेळंकी येथे एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी व एका मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (23 जानेवारी) सकाळी घडली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी मुलाने सावकारांकडून कर्ज घेतले आणि शेअर मार्केटमधून अपेक्षित पैसे न मिळाल्याने हे गवाणे कुटूंब संकटाच्या खाईत अडकले. मग ज्या सावकरांकडून पैसे घेतले होते त्याचा तगादा सुरू झाला आणि हा त्रास सहन न झाल्याने वडील, आई आणि त्या मुलाने मृत्यूलाच कवटाळले. सेवानिवृत्त पोलीस अण्णासो गुरसिद गव्हाणे (वय 65), पत्नी मालन अण्णासो गव्हाणे (वय 55) आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे (वय 30) अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथील निवृत्त पोलीस हवालदार कुटुंबाच्या आत्महत्ये प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात 14 जणांवर सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. विवेक घाटगे, किरण होसकोट, राजीव शिंगे, (तिघे रा. रायबाग तालुका, जि. बेळगाव), विनायक बागेवाडी, संतोष मंगसुळी (दोघे रा. हारुगेरी, रायबाग तालुका, जि. बेळगाव), अमित कुमार कांबळे, प्रवीण बनसोडे, पूजा शिंगाडे, शैलेंद्र शिंदे (चौघे रा. मिरज), बाळासाहेब माळी (रा. कवठेमहांकाळ), कमलेश कलमाडी (रा. नरवाड), अरुण थोरात, जितेंद्र पाटील (दोघे रा. सांगली), आणि जुबेर मोकाशी (रा. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर) अशा 14 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी सदर 14 जणांवर खासगी सावकारी अधिनियम आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चिट्ठीत नमूद असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिरज तालुक्यातील बेळंकी गावात जिल्हा पोलीस दलातील निवृत्त कर्मचाऱ्याने मुलगा, पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा कोट्यवधीच्या घरात गेल्याने आणि सावकाराचा कर्जवसुलीसाठी तगादा मागे लागल्याने संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या केल्याची माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड कर्ज झाल्याने मिरज, बेळंकीतील मालमत्ता विकली तरीही अद्याप दीड कोटी देणे होते. त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मृतदेहा शेजारी सापडलेल्या चिट्ठीत देखील कर्जाच्या बाबी नमूद असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. अण्णासाहेब गवाणे हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. तर त्यांचा मुलगा महेश हा इंजिनीअर होता. शेअर मार्केटमध्ये त्याने पैसे गुंतवणूक केली होती. हे पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्याने काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. अंदाजे कोटीच्या आसपास ही रक्कम असल्याची चर्चा आहे. महेश गवाणे याने काही दिवसांपूर्वी त्याला होणारा त्रास आणि यामुळे आपण आत्महत्या करणारी फेसबुक पोस्ट देखील लिहली होती. मात्र त्याच्या कुटुंबाने त्याची समजूत काढत त्याचा आत्महत्याचे विचार बदलला होता. या पोस्टमध्ये आर्थिक गोष्टींचा उल्लेख करत पैशाच्या वसुलीसाठी तगादा देणाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. तसेच जे लोक त्रास देत आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती करत आई व वडील यांची आठवण करून आत्महत्या करण्याचं स्पष्ट केले होते. सकाळी अण्णासाहेब गवाणे यांचे पुतणे यांना ही घटना निदर्शनास आली. या घटनेनंतर गावात एकाच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सावकारांच्या कर्जामुळे सांगलीत संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; 14 जणांवर सावकारीचा गुन्हा
सांगली, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm