बेळगाव : जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील विवाहितेची आत्महत्या

बेळगाव : जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील विवाहितेची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सासरच्या जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघा जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रेणूका शिवानंद वड्डर (वय 32, रा. रामतीर्थनगर) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती, सासू सासऱ्यावर येथील माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळे रेणूकाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंबंधी रेणूकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच तिला माहेरून सतत पैसे आणायला लावत असे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जाचाला कंटाळून रामतीर्थनगर येथील विवाहितेची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm