बेळगाव : बटाटे पोती चोरणार्‍या चोरट्याची धुलाई

बेळगाव : बटाटे पोती चोरणार्‍या चोरट्याची धुलाई

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) बटाटे पोती चोरी करणार्‍या चोरट्याला पकडून त्याला जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शुक्रवारी बेळगाव एपीएमसी परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांनी नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करून आपल्या वाहनामध्ये ठेवले. त्यानंतर त्या पुन्हा दुसरी भाजी खरेदी करण्यासाठी एका दुकानामध्ये गेल्या. हीच संधी साधून सदर चोरट्याने त्या वाहनातील बटाट्याचे पोते घेऊन तो आपल्या ऍक्टिवा दुचाकीवर ठेवून घेऊन जात होता.
त्यावेळी ही घटना सदर महिलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करताच तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला. त्याला एपीएमसीच्या प्रवेशद्वारातच पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्यानंतर त्या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशा घटना वारंवार एपीएमसी आवारात घडत आहेत. याचा बंदोबस्त पोलीस अधिकारी आणि एपीएमसी प्रशासनाने करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बटाटे पोती चोरणार्‍या चोरट्याची धुलाई

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm