बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक; तारीख जाहीर होताच उमेदवाराचे नाव देखील जाहीर करणार

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक;
तारीख जाहीर होताच उमेदवाराचे नाव देखील जाहीर करणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

लक्ष्मी हेब्बाळकर आणि प्रकाश हुक्केरी यांचे नाव नाही

बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी पडघम वाजायला सुरुवात झालीये. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने भाजपा व काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर तिर्‍या दिवशी काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगावमधील काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करताच तिसऱ्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात येईल. पक्षाकडून तिघांची नावे हायकमांडला पाठविण्यात आली आहेत. माझ्या (सतीश जारकीहोळी) नावासहित अनेकांची नावे पुढे आली आहेत. परंतु या यादीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव नाही. माजी खासदार प्रकाश हुक्केरी हे ईच्छूक असले तरीही त्यांचेही नाव यादीत नाही.
ते पुढे म्हणाले की, सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देण्यात येईल की नाही ते आपल्याला माहित नाही. परंतु काँग्रेसचा उमेदवार कोणता असेल, यावर निर्णय घेण्यात आला असून 3 उमेदवारांचा विचार करण्यात आला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच उमेदवाराचे नाव देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक; तारीख जाहीर होताच उमेदवाराचे नाव देखील जाहीर करणार
लक्ष्मी हेब्बाळकर आणि प्रकाश हुक्केरी यांचे नाव नाही

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm