बेळगाव : रोटरीतर्फे राहुलला वैद्यकीय मदत;

बेळगाव : रोटरीतर्फे राहुलला वैद्यकीय मदत;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : किडनी विकाराने त्रस्त असणाऱ्या गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील राहुल बिदरभाविकर (वय 20) या युवकाच्या उपचारासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव पुढे आला आहे. या क्लबने राहुलच्या पुढील 10 डायलिसीसाठी लागणारा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी अलीकडेच क्लबला भेटून राहुलच्या उपचारासाठी मदत व सहकार्य मागितले होते. राहुलची परिस्थिती पाहून क्लबने राहुलला मदत करण्यास सहमती दर्शविली आहे.
त्याचे डायलासीस केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल वडगाव येथील रोटरी केएलई डायलिसिस सेंटर येथे केले जात आहे. यावेळी रोटरी क्लबचे डॉ. मुकुंद उडचनकर, बसवराज विभूती, डॉ.विजयकुमार पाटील, फेसबुक फ्रेंडस सर्कलचे संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव व संतोष चौगुले उपस्थित होते. राहुल हा उद्यमबाग येथील कारखान्यात रोजंदारीवर जात होता. पण कोरोना काळात त्याची नोकरी गेली, त्यातच त्याला किडनी विकाराने जडले असून वडील गवंडी काम करतात तर आई इतरांच्या शेतात मोलमजुरी करतात.
त्यांच्या कुटुंबासाठी एकमेक आशेचा किरण असलेल्या राहुल या आजारात अडकल्याने त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांची ही परिस्थिती पाहून इतर संस्थांनाही राहुलच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन फेसबुक फ्रेंडस सर्कलने केले आहे. त्याचबरोबर राहुलच्या मदतीसाठी सहकार्य करणाऱ्या सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलचे आभार मानले आहेत.


आर्थिक मदतीसाठी या बँक खात्यावर रक्कम जमा करा.
बँक : केव्हीजी बँक, गुर्लगुंजी, खानापूर
अकाऊँट नंबर : 89059682631
आयएफएससी कोड : KVGV0002603
संपर्क क्रमांक : 9071207625

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : रोटरीतर्फे राहुलला वैद्यकीय मदत;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm