बेळगाव : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन्ही भावांना  अटक; पार्टीला नेऊन खून केला

बेळगाव : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन्ही भावांना अटक;
पार्टीला नेऊन खून केला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : तिओलीवाडा (ता. खानापूर) येथील विन्सेंट उर्फ इशांती बस्त्यांव परेरा (वय 29, रा. ख्रिश्चनवाडा, तिओली) या तरुणाच्या खूनप्रकरणी आणखी एका संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले. मायकल कैतान परेरा (28, रा. तिओलीवाडा) असे अटक केलेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. यापूर्वी मायकलचा मोठा भाऊ अलेक्स कैतान परेरा (33) यास अटक झाली आहे. अनैतिक संबंधातून भावांनी मिळून विन्सेंट याचा पार्टीला नेऊन खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
4 जानेवारी रोजी गावाजवळील शिवारात गवतगंजीमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत विन्सेंट याचा मृतदेह आढळून आला होता. फावड्याने डोकीत वार करुन आणि गळा आवळून त्याचा निघृणपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रकार आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी मृतदेह गवतगंजीत टाकून जाळण्यात आला होता. तिओलीत गवत गंजीत मृतदेह आढळलेल्या तरुणाचा खून झाल्याची खात्री पोलिसांना झाली होती. त्यामुळे, त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविली जात होती. दरम्यान, त्याचा खून करून नंतर गवत गंजीत घालून त्याला जाळण्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, शवचिकित्सा अहवालात तरुणाचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय त्याच्या डोक्यावर गंभीर वाराचे निशाण आढळून आले होते. त्यावरुन हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. संशयितांनी घाईगडबडीत विन्सेंट याचा मृतदेह गवतगंजीत घालून जाळण्याचा प्रयत्न केला. यामागे सदर घटना आत्महत्येचा प्रकार आहे. असे भासविण्याचा त्यांचा डाव होता. पण विन्सेंट याचा मृतदेह अर्धवट जळाला. त्यामुळे शवचिकित्सा करताना वैद्याधिकाऱ्यांना शरीरावरील व्रण व अन्य महत्वाचे पुरावे जमा करता आले.
अधिक माहिती : इशांती हा गावातील प्रत्येक समाज कार्यात सहभागी असायचा. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीतदेखील त्याचा सहभाग होता. त्याच्या शेतात गवताची झोपडी होती. तो रविवारी दुपारी शेतकाडे गेला होता. तो घरी परतला नाही. रविवारी तो अचानक बेपत्ता झाला. दरम्यान, कुटुंबीयांनी त्याच शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सोमवारी (4 जानेवारी) गवत गंजीत त्याचा होरपळलेला मृतदेह आढळून आला. गवतगंजीत संशयास्पद स्थितीत आढळला होता. सुरवातीपासूनच त्याचा खून झाल्याचा संशय होता. विन्सेंटचा 4 जोनवारीस गवतगंजीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. विन्सेंटचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला बोलवून घेऊन गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा मिटविण्यासाठी त्याचा मृतदेह गवतगंजीत टाकून पेटवून दिला. त्याने स्वत : च गवतगंजीत झोकून देऊन आत्महत्या केल्याचा बनाव संशयित आरोपी अॅलेक्स परेरा व त्याच्या साथीदारांनी रचला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सा केली. सुरुवातीपासून त्याचा खून झाला असण्याची शक्यता होती. त्या दिशेने तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. विन्सेंटने स्वत : च गवतगंजीत झोकून देत पेटवून घेतले असते तर जळल्यानंतर त्याने गवतगंजीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता पण मृतदेह गवतगंजीतच राहिल्याने पोलिसांना संशय आला. तसेच शवचिकित्सा अहवालात त्याच गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले तपासानंतर अॅलेक्सला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्यांंची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. अन्य दोघांचा शोध जारी असून पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील अधिक तपास करीत आहेत. विन्सेंट हा होतकरू तरूण होता. त्याच्या मागे आई, भाऊ - बहिण असा परिवार आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी गांभिर्याने घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तरुणाच्या खूनप्रकरणी दोन्ही भावांना अटक; पार्टीला नेऊन खून केला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm