बेळगावच्या दोघा युवकांना अटक; 2 किलो सोन्याची तस्करी

बेळगावच्या दोघा युवकांना अटक;
2 किलो सोन्याची तस्करी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरून सापळा रचून कार गाडीतून तस्करी करण्यात येत असलेले सुमारे 2 किलो ग्रॅम सोने जप्त केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी बेळगावच्या शहापूर येथील दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. तुषार (वय 27) आणि ज्योतीराम (वय 23, दोघे रा. शहापूर, बेळगाव) अशी अटक करण्यात आरोपींची नांवे आहेत.
कासरगोड कस्टम अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पल्लीकेरी टोलनाका येथे सापळा रचला. त्यानंतर कन्नूर येथून मंगळूरकडे जाणारी एक कार गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत लपून तस्करी करण्यात येत असलेले 2 किलो ग्रॅम वजनाचे बेकायदेशीर सोने आढळून आले. याप्रकरणी कार गाडीतील तुषार व ज्योतीराम या दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. कस्टमचे सहाय्यक आयुक्त ई. व्ही. विकास आणि कन्नूर कासरगोड कस्टम आयुक्त पी. पी. राजीव यांच्या मार्गदर्शनाखाली के. चंद्रशेखर, के. आनंद कोरागोड्ड व एम. विश्वनाथ यांनी ही कारवाई केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या दोघा युवकांना अटक; 2 किलो सोन्याची तस्करी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm