बेळगाव :  कॅम्पमधील फिश मार्केटचा होणार विकास; 'या' मतदारसंघाच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव

बेळगाव : कॅम्पमधील फिश मार्केटचा होणार विकास;
'या' मतदारसंघाच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कॅम्पमधील फिश मार्केट स्मार्ट करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत होती. ही मागणी पूर्ण होणार आहे. फिश मार्केटचा कायापालट करण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी 50 लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्याचे आश्वासन कन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत दिले होते. त्याचा पाठपुरावा करुन 50 लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत आ. बेनके यांनी दिली. फिश मार्केटची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्यासोबत कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ बर्चस्वा होते.
व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन विकास करण्यात येणार आहे. फिशमार्केटचा कायापालट होईपर्यंत फिश मार्केट तात्पुरते इतर ठिकाणी सुरु ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन व्यापारी वर्गाचे नुकसान होणार नाही. अत्याधुनिक व सुसज्जित फिश मार्केट उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील विकासासाठी आणखी 50 लाखाचा | निधी मंजूर करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. बेनके यांनी दिली. यावेळी अमरनाथ एम. एल. दोडमनी, अभियंता श्रीपाद कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.
गोकाक मतदारसंघाच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव
गोकाक विधानसभा मतदारसंघातील विशेष घटक योजनेंतर्गत 2019-20 सालाकरिता मंजूर 60 कोटी रुपये निधीतून कामे हाती घेण्यात आल्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली. गोकाक येथे पत्रकारांशा ते बोलत होते. अनुसूचित जाती जमाती गिरीजन उपयोजनेच्या योजनेतून 30 कोटी, अनुसूचित जाती - जमातीसाठीच्या 2019-20 सालातील शिल्लक 31.05 कोटी रुपये निधीतून गिरीजन व रेतापी वसती निवड केलेल्या गावात रस्ता, गटार, सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पेव्हर्स रस्ते, समुदाय भवन, खुली विहिरींची कामे हाती घेण्यात येत आहेत. 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनास पाठवण्यात आला असल्याची माहितीही जारकीहोळी यांनी दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कॅम्पमधील फिश मार्केटचा होणार विकास; 'या' मतदारसंघाच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm