बेळगाव शहरातील माणुसकीला सलाम...! हिंदू युवकाने केले ख्रिश्चन महिलेवर अंत्यसंस्कार

बेळगाव शहरातील माणुसकीला सलाम...!
हिंदू युवकाने केले ख्रिश्चन महिलेवर अंत्यसंस्कार

belgavkar.com | belgaum | belgavkar

जपली सामाजिक बांधिलकी

बेळगाव : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. त्यातच धर्म, रुढी, प्रथा परंपरा या विषयांवरून सोशल मीडियात बराच खल सुरू आहे. त्यात जो-तो आपल्या धर्माची श्रेष्ठता पटवून देतोय. अशावेळी, बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीच्या युवकाने माणुसकीच्या धर्माचं दर्शन घडवलंय. आपला धर्म बाजूला ठेवत या युवकाने एका असहाय्य ख्रिश्चन वृद्धेवर अंत्यसंस्कार केले.
आज गुरुवारी (7 जानेवारी) सकाळी निधन पावलेल्या फ्रान्सिना जॉर्ज डेल्लासिंग (वय 90, मूळ रा. दुर्गापूर, पच्छिम बंगाल) आणि भारतीय सैन्य दलातील (Army Ex Serviceman) कार्य केलेल्या ख्रिश्चन महिलेवर हिंदू युवकाने हेल्प फॉर निडी संघटनेच्या मदतीने ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करविले. चव्हाट गल्ली येथील राहुल किल्लेकर हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून फ्रान्सिना या असहाय्य ख्रिश्चन महिलेची देखभाल करत होते. गेल्या कांही महिन्यांपूर्वी तिला संजीवनी फाउंडेशन या वृद्धाश्रमात दाखल केले होते. त्याठिकाणी तिला सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळवून देण्याबरोबरच तिच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन काळजी घेतली जाईल, याची खबरदारी राहुल किल्लेकर घेत होते.
त्यानंतर आजारी पडल्याने तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी सकाळी तिचे निधन झाले. तिच्या निधनानंतर ख्रिश्चन अंत्यसंस्कार कसे केले जातात हे माहीत नसल्यामुळे राहुल यांनी Help for Needy कडे मदतीचा हात मागितला. संस्थापक-अध्यक्ष सुरेश अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या सायमन मंतेरो, सुनील धनावडे आदींनी पुढाकार घेऊन संबंधित मयत वृद्धेवर ख्रिश्चन दफनभूमीत ख्रिश्चन रितीप्रमाणे अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. याकामी त्यांना फिश मार्केट कॅम्प येथील चर्च आणि सेंट झेवियर्स चर्चच्या धर्मगुरूंचे सहकार्य लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील माणुसकीला सलाम...! हिंदू युवकाने केले ख्रिश्चन महिलेवर अंत्यसंस्कार
जपली सामाजिक बांधिलकी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm