बेळगाव रेल्वेस्थानक; विकास युद्धपातळीवर; दुसऱ्या प्रवेशद्वाराचे काम गतिमान

बेळगाव रेल्वेस्थानक;
विकास युद्धपातळीवर;
दुसऱ्या प्रवेशद्वाराचे काम गतिमान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येथील रेल्वेस्थानकाच्या विकासाला गती आली आहे. मुख्य प्रवेशद्वारासह दुसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वाराचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले. तसेच, पूर्वीच्या गुड्स शेडच्या ठिकाणी रेल्वेच्या स्वच्छतेसाठी कोच केअर शेड उभारले जात असून, यासाठी मोठे पिलर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात रेल्वे कोचची स्वच्छता स्थानकावरच करणे सोपे झाले आहे. बेळगावचे रेल्वेस्थानक हे ब्रिटिशकालीन आहे. स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम 2019 मध्ये हाती घेण्यात आले.
मुख्य प्रवेशद्वारंराच्या इमारतीचे 5 मजली बांधकाम केले जाणार आहे. सध्या मुख्य इमारतीचे 3 मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यासोबत इतर ठिकाणी बांधकाम सुरू आहे. याकरिता तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या जागेतून प्रवेशद्वार सुरु करण्यात आले आहे. मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे स्थानकाचे काम ठप्प झाले होते.
जुनपासून कामाला सुरवात करण्यात आली होती. पण, जुलैपासून बांधकामाने गती घेतली होती. रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराचे काम गतिमान झाले आहे. काम लवकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे, लवकरच प्रवाशांना एक सुसज्ज रेल्वेस्थानक मिळणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव रेल्वेस्थानक; विकास युद्धपातळीवर; दुसऱ्या प्रवेशद्वाराचे काम गतिमान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm