बेळगाव शहराच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी तब्बल 28 कोटी रुपये

बेळगाव शहराच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी तब्बल 28 कोटी रुपये

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहराच्या दक्षिण विभागातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी बेळगाव नगर विकास प्राधिकरण (बुडा BUDA - Belgaum Urban Development Authority) तब्बल 28 कोटी 62 लाख रुपये खर्च करणार आहे. या कामांसाठी बुडाने निविदा काढली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दक्षिण विभागातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. बुडाच्या निधीतून शहरातील रस्त्यांची सुधारणा करावी, अशी जुनी मागणी आहे. त्याबद्दल बुडाच्या बैठकीत चर्चाही झाली होती.
यावेळी दक्षिण विभागातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी 28 कोटी 60 लाख रुपये निधी खर्च करण्याचा निर्णय झाला होता. बुडाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली होती. कोरोनामुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. आता या कामांसाठी निविदा काढण्यात आहे. दक्षिण विभागात स्मार्ट सिटी योजनेतूनही अनेक कामे सुरु आहेत. तेथील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. आता उपनगरांमधील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा बुडाकडून केली जाणार आहे.
राणी चन्नम्मानगर, भवानीनगर, गोडसेवाडी व पार्वतीनगर येथील रस्त्यांच्या सुधारणेसाठी 4 कोटी 86 लाख 26 हजार रुपये, शहापूर येथील मठ गल्ली, कचेरी गल्ली, ओमनगर येथील रस्त्यांच्या सुधारणेसाठी 4 कोटी 60 लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय खासबाग टीचर्स कॉलनी, उप्पार गल्ली, मारुती गल्ली, नागेंद्र कॉलनी, राघवेंद्र गल्ली, बाजार गल्ली, जुने बेळगावमधील अंतर्गत रस्ते, जोशी गल्ली व बसवाण गल्लीतील रस्ते सुधारणेसाठी 4 कोटी 84 लाख रुपये निधी खर्चण्यात येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहराच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी तब्बल 28 कोटी रुपये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm