बेळगाव : समर्थनगरात खडा पहारा नोंदणी | 32 मण सुवर्ण सिंहासन | किल्ले रायगड

बेळगाव : समर्थनगरात खडा पहारा नोंदणी | 32 मण सुवर्ण सिंहासन | किल्ले रायगड

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव

बेळगाव : किल्ले रायगड येथे स्थापित होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजनेची नोंदणी समर्थनगर विभागातुन करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या मातीत गाडून हिंदवी स्वराज्याचे तक्त निर्माण केले. 32 मण सुवर्ण सिंहासन निर्माण करून राज्याभिषेक करून घेतला. कालांतराने ते सोन्याचे सिंहासन मोघलांनी नष्ट केले. संभाजीराव भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून ते पुन्हा स्थापित करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानने केला आहे. हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर जगाचा हिंदुस्थानकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.
हे सिंहासन निर्माण झाल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान चे धारकरी आणि शिवभक्त खडा पहारा देण्यासाठी सज्ज आहेत. 1 तुकडी दररोज रायगड येथे पहारा देण्यासाठी सज्ज असेल. यासाठी किल्ले रायगडावर एक दिवस खडपहारा सेवा देण्यासाठी समर्थ नगर बेळगाव येथे नाव नोंदणी करण्यात आली.
या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उमेश ताशीलदार व कल्लापा पाटील यांनी खडापहारा सेवेबाबत माहिती दिली. समर्थनगर परिसरातील 30 हुन जास्त नागरिकांनी आपली नावे यावेळी नोंद केली. त्याचबरोबर एक दिवस रायगड सेवेसाठी संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला, बेळगाव शहर प्रमुख अजित जाधव, कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लापा पाटील, परशराम कोकितकर, उमेश ताशीलदार, गजानन पाटील, नितीन कुलकर्णी, गजानन निलजकर, अतुल केसरकर, गिरीश कणेरी, शुभम मोरे, राम कटारे, नागेश गावडे, निर्मल कणेरी, प्रभाकर हलगेकर, विनायक इंचल, निलेश कणेरी, सचिन कणेरी, कृष्णा इठगिकर, रमेश चौगले, विनायक इंचल, सुहास गावडे, राजेंद्र कणेरी, राजू पाटील, परशराम बेकवाडकर, महेश पालकर, किरण लगरकांडे, किशोर कुंडेकर, ईश्वर पाटील, अभिजित उचगावकर, अक्षय कोडगे, शुभम उचगावकर, विशाल पाटील, संतोष कणेरी, तसेच समर्थ नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : समर्थनगरात खडा पहारा नोंदणी | 32 मण सुवर्ण सिंहासन | किल्ले रायगड
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm