बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक; 'माझे नाव निश्चित केले....' माञ,

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक;
'माझे नाव निश्चित केले....' माञ,

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेसकडून सतीश जारकीहोळींच्या नावावर बहुदा शिक्कामोर्तब

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रलंबित आहे. बेळगावात काही दिवसांपासून सुरेश अंगडी यांचे वारसदार कोण, याची चर्चा सुरु आहे. भाजप व काँग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याचे आराखडे बांधले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस व भाजपने उमेदवार निवडीसाठी जोरदार तयारी सुरु केली असतानाच
काँग्रेसचे माजी मंत्री आणि केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी उमेदवारीबाबत एक वक्तव्य केलं आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने माझे नाव निश्चित केले. आणखी एक बैठक बेळगाव येथे होणार आहे. तेथे निवडलेला उमेदवार अंतिम होईल.
पहिल्यापासूनच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी यांच्याच नावाची चर्चा होती. उमेदवारीसंदर्भात बंगळूरमध्ये सोमवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी बहतेकांनी आमदार जारकीहोळी यांनाच उमेदवारी देण्याची शिफारस केली. आमदार जारकीहोळी यांना उमेदवारी दिल्यास जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस उमेदवार निवड समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या पहिल्या बैठकीत सतीश जारकीहोळी यांचेच नाव जोरदार चर्चेत होते. सतीश जारकीहोळी यांचे जवळपास लोकसभा तिकिट निश्चित झाले आहे. यावर बोलताना केपीसीसी अध्यक्ष सतीश जारकीहोळी म्हणाले की, जिल्ह्यातील आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून योग्य उमेदवाराची अंतिम घोषणा केली जाईल. शुक्रवारी बेळगाव शहरातील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूकीसाठी माझे नाव आधीच आले आहे. हे जाणीवपूर्वक केले जाते. बंगलोरमध्ये बसून उमेदवाराबद्दल बोलणे शक्य नाही. त्यासाठी एक काँग्रेसची समिती आहे. अजून एक बैठक झाली की उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. बेळगावमध्ये निवडलेला उमेदवार हाच अंतिम असेल.
उमेदवार निवडीसाठी माजी मंत्री एम. बी. पाटील यांच नेतृत्वाखाली काँग्रेसने 11 जणांची समिती स्थापन केली आहे. सोमवारच्या बैठकीत ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचीही चर्चा झाली आहे. बैठकीला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, डॉ. जी. परमेश्वर, ईश्वर खांडे, आमदार हेब्बाळकर, आमदार महांतेश कौजलगी आदी उपस्थित होते.
निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. बेळगाव लोकसभेसाठी फेब्रुवारी 2021 मध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. सलग चार वेळा विजयी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचा गड आता रिक्त झाला आहे. या अनपेक्षित पोटनिवडणुकीत काँग्रेस विजय मिळविण्यासाठी रणनीती आखत आहे. तारीख जाहीर झाली नसली तरी लोकसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी पोटनिवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी राजकारणी खेळ खेळले जात आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक; 'माझे नाव निश्चित केले....' माञ,
काँग्रेसकडून सतीश जारकीहोळींच्या नावावर बहुदा शिक्कामोर्तब

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm