श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची गडकोट मोहिम जाहीर  : श्री पन्हाळगड ते विशाळगड

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची गडकोट मोहिम जाहीर : श्री पन्हाळगड ते विशाळगड

belgavkar.com | belgaum | belgavkar

गडकोट मोहीम अर्थात् धारातीर्थ यात्रा पन्हाळगड ते विशाळगड

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गडकोट मोहिम अर्थात धारातीर्थ यात्रे ची घोषणा झालेली आहे. किल्ले श्री पन्हाळगड ते किल्ले श्री विशाळगड असा मोहिमेचा मार्ग असुन ही मोहिम पावनखिंड मार्गे असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) आयोजित केल्या जातात. प्रत्येक वर्षी नवरात्रात शेवटच्या दिवशी म्हणजे दसर्‍याची दिवशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी मोहिमेची घोषणा करतात. यंदा कोरोनामुळे ही घोषणा तेव्हा होऊ शकली नाही.
आता सर्व शिवप्रेमींची उत्सुकता संपली असून वर्ष 2021 ची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही पन्हाळगड ते विशाळगड अशी होईल, असे भिडे गुरुजी यांनी सांगलीत घोषित केले आहे. या मोहिमेचा दिनांक लवकरच घोषित करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या श्री रायगडावर उभारण्यात येणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाला ‘खडा पहारा’ देण्यासाठी धारकर्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
खडतर अशा मार्गातून दर्‍याखोर्‍यांमधून, खाचाखळण्यांमधून, उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. चार दिवस सर्व थरांमधील धारकरी एक येतात. त्यामुळे या मोहिमेची प्रत्येक धारकरी-शिवप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. अखेर या मोहिमेची घोषणा झाल्यामुळे धारकर्‍यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची गडकोट मोहिम जाहीर : श्री पन्हाळगड ते विशाळगड
गडकोट मोहीम अर्थात् धारातीर्थ यात्रा पन्हाळगड ते विशाळगड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm