बेळगावात आणखीन एक आरटीओ कार्यालय; येथे 4 एकर जागा मंजूर

बेळगावात आणखीन एक आरटीओ कार्यालय;
येथे 4 एकर जागा मंजूर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आरटीओ कार्यालयासाठी बेळगाव शहरालगतच्या यमनापुर गावात 4 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली आहे. बेळगाव येथील आरटीओ कार्यालयात पोस्ट ऑफिस शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना आमदार अनिल बेनके यांनी आरटीओ अधिकार्यांना सांगितले की यमनपुरा गावातील जागा मंजूरीसाठी अनेक समस्या होत्या. त्या सर्व सोडवत ही जागा मंजूर झाली आहे. आता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आमदारांनी आरटीओ अधिकार्यांना दिल्या.
Regional Transport Office (RTO) वाहन परवाना देण्याच्या उद्देशाने कणबर्गीत एक 823 लाख खर्चून सुसज्ज ट्रॅक तयार करण्यात येत आहे. 80% काम झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि सेवा चालू करावी, असे निर्देश आमदारांनी अधिकार्यांना दिले. यावेळी पोस्ट ऑफिस आणि आरटीओचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात आणखीन एक आरटीओ कार्यालय; येथे 4 एकर जागा मंजूर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm