बेळगावचा 'रॅन्चो'; दहावीतील विद्यार्थ्याने स्क्रॅपमधून बनवली इलेक्ट्रिक कार

बेळगावचा 'रॅन्चो';
दहावीतील विद्यार्थ्याने स्क्रॅपमधून बनवली इलेक्ट्रिक कार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दहावीत शिकणाऱ्या अंश राव या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. विद्युत ऊर्जेवर बॅटरी चार्ज करून 70 किलोमीटर धावणारी प्रदूषणरहित कार तयार केली आहे. बाजारातील वापरबाह्य झालेले टायर, शीट, बॅटरी अशा विविध आवश्यक वस्तू खरेदी केल्या. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ अशी विद्युत कार तयार केली. लहानपणापासून अंशचे आपण कार तयार करावी असे स्वप्न होते. अंशचे हे स्वप्न अंश दहावीत आल्यावर साकार झाले आहे.
सर्वप्रथम कारची चेस तयार करणे आव्हानात्मक होते. अनेक ठिकाणी फिरून आपल्याला हवी तशी चेस तयार करून घेण्यात अंशला यश मिळाले. कारसाठी लागणारे वेगवेगळे पार्ट अनेक गॅरेज फिरून अंशने एकत्रित केले.
कारमध्ये रिअर कॅमेरा असून त्यामुळे कार मागे घेताना काही अडथळे असतील तर समजतात. याशिवाय कारला एक अलार्म सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे. त्यामुळे चावीचा वापर न करता एखादा कारचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर अलार्म वाजू लागतो. ही कार चार्जिंग करायला साधारण तीन ते चार तास लागतात. एकदा चार्जिंग केल्यास ही कार 70 किलोमीटर अंतर आरामात कापू शकते. आॅटोमोबाईल क्षेत्रात नव्याने विकिसत झालेल्या तंत्रज्ञाचा वापर या कार मध्ये केला आहे. भविष्यात या कार ला सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर आणि सोलर कार म्हणून विकसित करण्याचा अंशचा मानस आहे. तो केएलई इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीत शिकत असून स्कूलच्या प्राचार्या दीप्ती इंगळे यांनी अंशचे अभिनंदन केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचा 'रॅन्चो'; दहावीतील विद्यार्थ्याने स्क्रॅपमधून बनवली इलेक्ट्रिक कार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm