बेळगाव : बिम्स हॉस्पिटलमध्ये ओबीजी विभाग आणि पीडियाट्रिक विभाग

बेळगाव : बिम्स हॉस्पिटलमध्ये ओबीजी विभाग आणि पीडियाट्रिक विभाग

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, वैद्यकीय विज्ञान संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने बिम्स (BIMS - बेळगाव जिल्हा रुग्णालय - Belgaum Institute of Medical Sciences) हॉस्पिटलच्या प्रांगणात प्रसूती वार्डाच्या पहिल्या मजल्यावर ओबीजी विभाग आणि 90 बेडच्या सुसज्जित पीडियाट्रिक विभागाच्या (बालरोग शस्त्रक्रिया) इमारतीचा उदघाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी विविध विकास कामकाजांचा शुभारंभ केला. यावेळी पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, सरकारकडून आता जानेवारीपासून या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सिटी स्कॅन, ब्लड टेस्ट सर्व काही मोफत केले जाणार आहे.
हॉस्पिटलमध्ये पेपरलेस कामकाज करण्यात येणार आहे. कोणत्याही औषधाची गरज भासल्यास सरकारकडूनच त्याचा पुरवठा करण्यात येईल. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये 7 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 350 बेडचे सुसुज्ज्ज असे हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या आधारे लवकरच पीएचसी सुरु करण्यात येतील. ऍम्ब्युलन्स सेवा मजबूत केली जाणार आहे. जर स्वतःहून चांगले काम केले गेले तर खाजगी रुग्णालयांपेक्षाही उत्तम आरोग्य सेवा या ठिकाणी मिळू शकेल. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बिम्सचे संचालक डॉ विनय दास्तीकोप, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, महापालिकेचे आयुक्त जगदीश के. एच., मुख्य प्रशासन अधिकारी सईदा आफ्रिना बानू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बिम्स हॉस्पिटलमध्ये ओबीजी विभाग आणि पीडियाट्रिक विभाग

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm