बेळगाव : शिवभक्त-धारकर्यांचे स्वागत आणि सत्कार; बेळगाव ते किल्ले रायगड असा सायकल प्रवास

बेळगाव : शिवभक्त-धारकर्यांचे स्वागत आणि सत्कार;
बेळगाव ते किल्ले रायगड असा सायकल प्रवास

belgavkar.com | belgaum | belgavkar

मच्छे ते किल्ले रायगड आणि परतीचा प्रवास किल्ले रायगड ते बेळगाव व्हाया गणपती पुळे मंदिर सायकलवरूनच

बेळगाव : मच्छे, वाघवडे, हालगा, धामणे या 4 गावातील शिवभक्त-धारकर्यांनी बेळगाव ते किल्ले रायगड असा सायकल प्रवास करत दुर्गराज श्री किल्ले रायगड येथे जाऊन श्री छञपती शिवाजी महाराजांचे 32 मन सुवर्ण सिंहासन लवकरात पूर्ण होण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरणी साकडं घातले आहे. सर्वांच्या वतीने रायगडावर दिपोस्तव साजरा करण्यात आले. किल्ले रायगडावर श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीनं 32 मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन निर्माण होणार आहे. त्यासाठी हा सायकल प्रवास होता.
बेळगावला सायकलवरून परत आल्यावर शिवभक्त, दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, बापट गल्ली शिवभक्त, महाराष्र्ट एकीकरण युवा समिती आणि शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व स्वागत करण्यात आले.
कल्लापा जयनाचे, किशोर लाड, हरीश पाटील, बबितेश सुळगेकर, रवी मिसाळे, रोहन कनबरकर, नागराज लाड, अमोल बेळगुंदकर, अमित कनबरकर, प्रवीण पाटील हे सर्व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री दुर्गसेवा बेळगावचे शिवभक्त-धारकरी दिपावलीच्या निमित्ताने सायकल मोहिमेचे नियोजन करुन गडकोट मोहीम करण्यासाठी शुक्रवारी (13 नोव्हेंबर) रात्री ठिक 11 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक (बोगारवेस बेळगाव) येथून निघाले होते. कोल्हापूर, कराड, सातारा असे टप्पे पार करत ते सोमवारी (16 नोव्हेंबर) हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज श्री किल्ले रायगड येथे पोहचले. 32 मन सुवर्ण सिंहासनाचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शिवछत्रपतींच्या चरणी साकडं घालुन दिपोत्सव साजरा केला. परतीचा प्रवासही त्यांनी सायकलवरूनच केला. किल्ले रायगड येथून त्यांंनी परतीच्या प्रवासात गणपती पुळे येथील गणरायालाही साकडे घातले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शिवभक्त-धारकर्यांचे स्वागत आणि सत्कार; बेळगाव ते किल्ले रायगड असा सायकल प्रवास
मच्छे ते किल्ले रायगड आणि परतीचा प्रवास किल्ले रायगड ते बेळगाव व्हाया गणपती पुळे मंदिर सायकलवरूनच

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm