news_accident_1.jpg | बेळगाव : विद्युत खांबाला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : विद्युत खांबाला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हुक्केरी - चिकोडी राज्य महामार्गावर हुक्केरी शहराबाहेर विद्युत खांबाला दुचाकी जोराने धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हुक्केरी - चिकोडी राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात संतिनाथ गुरुसिद्धण्णावर (वय 30, रा. बेल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) या तरूणाचा मृत्यू झाला.
हिरो होंडा मोटारसायकल घेऊन सदर तरूण चिकोडीकडे भरधाव वेगाने निघाला होता. हुक्केरी शहराबाहेरील अक्षर दासोह केंद्राजवळ दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडीची रस्त्याजवळील विद्युत खांबाला धडक बसली. झालेल्या या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. अपघातानंतर हुक्केरी सार्वजनिक रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला आहे. या अपघाताची नोंद हुक्केरी पोलिस स्थानकात झाली आहे.