बेळगाव शहरात काॅलेज सुरू होताच 6 जणांना कोरोनाची बाधा coronavirus

बेळगाव शहरात काॅलेज सुरू होताच 6 जणांना कोरोनाची बाधा coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : 17 नोव्हेंबरपासून राज्यात कॉलेजेस पुन्हा सुरू झाली आहेत. यात अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि पदवी महाविद्यालये (engineering, diploma and degree) समाविष्ट आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने केंद्र सरकारने अनलॉक करण्यास सुरुवात केली. तर काही राज्य सरकारांनी शाळा, महाविद्यालये सुरू केली. मात्र,
बेळगावात महाविद्यालये /काॅलेज सुरू केल्यावर 6 जणांना कोरोनाचा संसर्ग.
3 महाविद्यालयांमधील 6 कर्मचार्यांना coronavirus
कर्नाटक सरकारने कोविड संदर्भातील नियम आणि मार्गदर्शक सूचनांसह Diploma, Degree, Engineering College सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बेळगाव शहरातील 3 College मधील 6 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयाला येण्यापूर्वी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. वेगवेगळ्या College मधील 2,027 हून अधिक कर्मचार्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 250 जणांचे कोरोना रिपोर्ट आले असुन त्यापैकी 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक
राज्यभरातील पदवी महाविद्यालये निर्णयाप्रमाणे सुरू Degree, Diploma, Engineering Colleges
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना आणि तज्ज्ञांनी सादर केलेल्या शिफारसीनुसार व्यवस्था करून महाविद्यालये सुरू झाली आहेत. परंतु, महाविद्यालये सुरु करताना काही अटी आणि नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला पाठविण्यासाठी इच्छुक पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात यावे. वर्गखोल्यात बसताना सामाजिक अंतर राखावे. कोरोना नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांचे पथक स्थापले जावे, अशा सूचना महाविद्यालयांना केल्या आहेत. महाविद्यालयाला येण्यास अनास्था दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाचा पर्याय देण्यात यावा. या दरम्यान तांत्रिक अडचण किंवा विषय समजत नाही, असे विद्यार्थ्यांना वाटल्यास महाविद्यालयात येऊन विषय समजून घेता येईल. एक महिन्याचा अभ्यासक्रम तयार करून तपशील ऑनलाईन माध्यमातून पाठविला जाईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात काॅलेज सुरू होताच 6 जणांना कोरोनाची बाधा coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm