बेळगाव ता. गोकाक : गोकाक तालुक्यातील ममदापूर क्रॉसजवळ रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाले आहेत. सर्व मृतक रामदुर्गा तालुक्यातील (जि. बेळगाव) मुरकटनाळ गावातले आहेत. रामदूर्ग येथील हनुमंत परकनट्टी यांच्यासह दोन महिला आणि चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला.
संकेश्वर-यरगट्टी-सौंदत्ती राज्य महामार्गावर रविवारी (15 नोव्हेंबर) टाटा ऐस आणि इंडिका कारची टक्कर धडक झाल्याने हा अपघात घथला. गोकाक ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. टाटा ऐस येथील दोन लोक गंभीर जखमी झाले आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत.
- बेळगाव : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या
- बेळगाव : NH4 वर अपघातामुळे काचांचा खच
टाटा गुड्स वाहन (KS 24 A 2088) आणि कार (MH 04 EQ 0771) यांच्यात दुपारी 2.45 वाजता अपघात झाला. पती हणमंत फकिरप्पा परकनट्टी (वय 28), पत्नी मालव्व (वय 25), मुलगी किर्ती (वय 5), सिद्दप्पा फकिरप्पा परकनट्टी (वय 50)यांचा मृत्यू झाला आहे.