…म्हणून 7600 टन वजनाची शाळेची संपूर्ण इमारतच ‘चालू लागली’ Video;

…म्हणून 7600 टन वजनाची शाळेची संपूर्ण इमारतच ‘चालू लागली’ Video;

belgavkar.com | belgaum | belgavkar

शाळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली

चीनमधील इंजीनियर्सने नुकतीच एक भन्नाट गोष्ट केली आहे. या इंजीनियर्सने एक 7,600 टन वजनाची संपूर्ण इमारतच न तोडता एका जागेवरुन दुसरीकडे हलवली आहे. ही इमारत म्हणजे शांघाय शहरातील एक शाळा आहे. या शाळेचे बांधकाम 1935 साली म्हणजेच 85 वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. शाळेची इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत या इंजीनियर्सने जगभरातील इंजीनियर्ससमोर एक उदाहरण ठेवलं आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिथे ही शाळेची इमारत आहे तिथे एका नव्या वस्तूचे निर्माण केलं जात आहे. ही इमारत ऐतिहासिक असल्याने ती तोडण्याऐवजी इंजीनियर्सने तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करण्याचा ठरवलं आणि त्यामध्ये त्यांना यश आलं.
चीनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत स्थलांतरित करण्यासाठी 198 रोबोटिक टूल्सचा वापर करण्यात आला. हजारो टन वजनाच्या इमारतीची थोडीही पडझड न होऊ देता तिला 62 मीटर दूर सरकवण्यात आलं. चीनमधील सीसीटीव्ही न्यूज नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार हे काम एकूण 18 दिवस सुरु होतं. 15 ऑक्टोबर रोजी हे काम पूर्ण झालं.
आतापर्यंत अशापद्धतीने इमारत हलवण्यासाठी मोठ्या प्लॅटफॉर्मवर किंवा जास्त क्षमता असणाऱ्या क्रेनची मदत घेतली जात होती. मात्र चीनमधील ही शाळा स्थलांतरित करण्यासाठी रोबोटिक लेग्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याच रोबोटिक लेग्सच्या मदतीने संपूर्ण इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. याच संपूर्ण प्रक्रियेचा टाइम लॅप्स व्हिडीओही व्हायरल झालाय. यापूर्वी 2017 मध्ये 135 वर्ष जुन्या आणि दोन हजार टन वजणाऱ्या ऐतिहासिक बौद्ध मंदिरालाही 30 मीटर दूर सरकवण्यात आलं होतं. या कामासाठीही 15 दिवसांचा कालावधी लागला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

…म्हणून 7600 टन वजनाची शाळेची संपूर्ण इमारतच ‘चालू लागली’ Video;
शाळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm