belgaum-gangwadi-youth-murdered-azamnagar-shahabaz-202010.jpg | बेळगाव शहरात युवकाचा खून… पोलिसांचा सौम्य लाठी प्रहार | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात युवकाचा खून… पोलिसांचा सौम्य लाठी प्रहार

belgavkar.com | belgaum | belgavkar

धारधार हत्त्यारांनी हल्ला करून राउडी शीटरचा भीषण खून

बेळगाव : काही अज्ञातांनी धारधार हत्त्यारांनी हल्ला करून राउडी शीटरचा भीषण खून केल्याची रविवारी रात्री 11 वाजता गँगवाडी भागातील शेख हॉस्पिटल जवळ घडली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव शहबाज शेरखान पठाण उर्फ राउडी शहबाज (वय 24, रा. दुसरा क्रॉस, संगमेश्वरनगर, आझमनगर एरिया) असे आहे. पूर्व वैमानस्यातून हा खून झाला असावा अशी शक्यता असून नेमकं कोणत्या कारणासाठी खून झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मयत युवकावर अनेक पोलीस स्थानकात आरोपाचे गुन्हे आहेत. दोन वर्षापूर्वी शहबाजने काकती जवळ दोन युवकावर चाकू हल्ला केला होता. टाटासुमोतून फिल्मी स्टाईलने दुचाकीचा पाठलाग करत युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. दसरोत्सवादिवशी रविवारी मध्यरात्री शिवबसवनगर परिसरात हा थरार घडला आहे.
belgaum-gangwadi-youth-murdered-azamnagar-shahabaz-arrested-202010.jpg | बेळगाव शहरात युवकाचा खून… पोलिसांचा सौम्य लाठी प्रहार | belgaum news | belgavkar बेळगावकर
नाईक आणि दड्डी
मुत्यानट्टीच्या दड्डी ब्रदर्सचा बदला
पोलिसांनी खून प्रकरणी बसवाणी सिध्दाप्पा नाईक (वय 27) आणि बसवराज होळ्याप्पा दड्डी (वय 26) (दोघेही राहणार मुत्यानट्टी गाव) या दोघांना अटक केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासचक्रे गतीमान केली. आज वरील दोघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
रविवारी मध्यरात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास शैबाजचा मृत्यू झाला आहे. शैबाज हा अरफात मोहम्मद अन्सार या आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरुन जात असताना केए 42 एम 0368 क्रमांकाच्या टाटासुमोतून त्यांचा पाठलाग करण्यात आला. गँगवाडी येथील ए. एम. शेख मेडीकल कॉलेजजवळ दुचाकीला सुमोने धडक मारण्यात आली. सुमोची धडक बसताच शैबाज व अरफात दोघे खाली पडले. जीवाच्या आकांताने शैबाज तेथून पळाला. लक्ष्मण दड्डी व त्याच्या साथीदारांनी तलवार घेवून शैबाजचा पाठलाग केला. याचवेळी तो शिवबसवनगर येथील निवृत्त पोलीस उपअधिक्षक पांडुरंग यलीगार यांच्या घरात शिरला. मारेकर्यांनी घरात घुसून तलावारीने सपासप वार करुन शैबाजचा काटा काढला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. युवकांच्या गटाने हल्ला केलेल्या घटनेची दृश्ये जवळील सीसीटीव्ही कैद झाली आहेत. बेळगाव शहरात युवकाचा खून झाल्याने तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच शेकडो युवकांनी सिव्हिल इस्पितळा समोर गर्दी केली होती. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला करण्यात आला. रविवारी मध्यरात्री पर्यंत जिल्हा रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. माळमारुती पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
युवकाच्या भीषण खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोघा आरोपींना आज मंगळवारी (27 ऑक्टोबर) सकाळी जेएमएफसी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी तीन दिवसासाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बसवराज व बसवानी या दोघा आरोपींना पोलिस बंदोबस्तात हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाकडे नेण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर अधिक तपास करीत आहेत. लवकरच खुनासाठी वापरण्यात आलेली तीक्ष्ण हत्यारे जप्त करण्याबरोबरच दड्डी गँगच्या आणखीन काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
अंगावर चिखल उडालेल्या प्रसंगापासून या प्रकरणाची सुरुवात झाली होती. आणि ती रक्तरंजित खुनाने समाप्त झाली.
चार वर्षांपूर्वी अंगावर चिखल उडाल्यामुळे सुरु झालेल्या संघर्षाची माहिती उजेडात आली. 9 जुलै 2016 रोजी मोटार सायकलमुळे अंगावर चिखल उडाल्यामुळे शैबाज व आरोपी बसवाणी नाईक यांच्यात हाणामारी झाली होती. काकती पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटात समेटही घडला होता. समेटासाठी जाताना 22 एप्रिल 2019 रोजी शैबाज व त्याच्या साथीदारांनी काकती येथील जुन्या क्लासीक बार जवळ बसवाणी नाईक (वय 27) व सचिन सिध्दाप्पा दड्डी (वय 24, दोघेही रा. मुत्यानट्टी) यांच्यावर चाकु हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही तरुणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे बसवाणी व सचिन यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. तेंव्हापासून या दोन्ही गटात तेढ वाढला होता. रविवारी लक्ष्मण दड्डी व त्याच्या साथीदारांनी टाटासुमोतून पाठलाग करत शैबाजचा खून केला आहे. शैबाजचे वडील शेरखान पठाण यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण दड्डीसह फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
दड्डी ब्रदर्सचा बदला
हाॅस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे या दड्डी गँगची / टोळीची प्रतिष्ठा कमी झाली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दड्डी ब्रदर्स सूड घेण्याच्या तयारीत होते. ते शहबाजची वाट पाहत होते. कारण शहबाज गोव्याला पळून गेला होता. या प्रकरणाची काकती पोलिस ठाण्यात नोंद होताच त्यावेळचे काकतीचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कोजलगी यांच्या भीतीने शेहबाज गोव्यात पळून गेला. गोव्याला गेलेल्या शहबाजचा काकती पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी त्याच्या सासर्याने त्याची जामीनवर सुटका केली होती. दुसर्‍या प्रकरणात, माजी आमदार आणि शहरातील एका माजी नगरसेवकाने त्याला बेल दिली होती.