कर्जदारांना दिलासा! 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना सवलत

कर्जदारांना दिलासा! 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना सवलत

belgavkar.com | belgaum | belgavkar

दिवाळीपूर्वी मिळणार खूशखबर;
कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ होणार

केंद्र सरकारनं सामान्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केलीय. या घोषणेमुळे ज्यांनी कर्ज घेतलंय, त्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. मॉरॅटोरियम कालावधीतील शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या कालावधीशी संबंधित व्याजावर सूट देण्यास मंजूरी देण्यात आलीय. 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना ही सवलत मिळणार आहे. 6 महिन्यांसाठी दिल्या गेलेल्या सवलतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर सूट देण्याची योजना लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश केंद्राला दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सामान्यांचं तोंड गोड होणार आहे.
दिवाळीपूर्वी मिळणार खूशखबर; कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ होणार
दिवाळीपूर्वी केंद्र सरकार देशातील कोट्यवधी नागरिकांना खूशखबर देणार आहे. आता कर्जावरील व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारकडून न्यायालयाला ही माहिती दिली जाणार आहे.
कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याचे सूत्रांकडून समजते. सामान्यांची दिवाळी आता सरकारच्या हातात आहे असे मत न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी व्यक्त केले होते. त्यानंतरच वेगाने हालचाली झाल्या आणि सरकारने निर्णय घेतला असे सांगितले जात आहे. कोरोना संकटामध्ये कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत पुढे ढकलण्याचा अधिकार कर्जदारांना दिला गेला होता. बँकांचे त्या काळातील व्याज भरण्याची तयारी सरकारने दर्शवली होती. त्यानंतरही अनेक बँकांना व्याजावर व्याज आकारणे सुरूच ठेवले होते. त्याविरोधात सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.
कर्जाचे हप्ते भरले न गेल्याने चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यातील फरकाची रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये भरावे लागणार आहेत. 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मासिक हप्ते त्याचप्रमाणे शिक्षण, घर, वाहन खरेदीसह आठ प्रकारच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज माफ केले जाईल असे सरकारने न्यायालयाला सांगितले होते. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाच्या थकबाकीवरील व्याजही घेतला जाणार नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्जदारांना दिलासा! 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सर्वसामान्यांना सवलत
दिवाळीपूर्वी मिळणार खूशखबर; कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm