बेळगाव : साहेब फाउंडेशनच्या वतीने रेणुका देवस्थानाला ऑक्सीजन सिलेंडरची भेट

बेळगाव : साहेब फाउंडेशनच्या वतीने रेणुका देवस्थानाला ऑक्सीजन सिलेंडरची भेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावच्या साहेब फाउंडेशनच्या वतीने सौंदत्ती येथील श्रीक्षेत्र यल्लम्मा श्री रेणुका देवस्थानाला ऑक्सीजन सिलेंडर ची भेट देण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवस्थानचे कार्यकारी वर्ग व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत आज बुधवारी सदर सिलेंडर किट देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. बेळगावचे माजी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्याची धुरा त्यांच्या पत्नी उज्वला पाटील 'साहेब फाऊंडेशन'च्या माध्यमातून पुढे नेत आहेत. गेल्या वर्षभरापासून उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार साहेब फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
गतवर्षीच्या महापुरानंतर यावर्षी कोरोना काळातील जनतेच्या अडीअडचणीची दखल घेत साहेब फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारच मदत गरीब गरजूंना देण्यात आली होती. फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी गणेशोत्सवादरम्यान आरोग्य उत्सव उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर आज श्रीक्षेत्र रेणुका देवस्थानातील कार्याची दखल घेत देवस्थान समितीला ऑक्सीजन किट भेट देण्यात आला. गेल्या सात महिन्यांच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. दर्शन बंद काळात रवी कोटारगस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान परिसरात विविध विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक कर्मचारी विकास कामात गुंतले आहेत. नजीकच्या काळात मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर भाविकांची वर्दळ वाढणार आहे. गर्दीच्या वेळी कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे. याची दखल घेत फाउंडेशनच्या वतीने श्री रेणुकादेवी देवस्थानाला ऑक्सीजन सिलेंडर चे भेट देण्यात आली आहे.
आज बुधवारी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार श्रीकांत काकतीकर, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष हिरालाल चव्हाण, मुक्तीधाम माजी अध्यक्ष विजय सावंत, ईश्वर जोरापुर तसेच विठ्ठल पेटकर यांनी सिलेंडर व अन्य साहित्य कोटारगस्ती यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी काकतीकर यांनी साहेब फौंडेशनच्या माध्यमातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या कार्याचा पुढे नेण्याचे काम त्यांच्या सुविद्य पत्नी उज्वला पाटील यांनी हाती घेतलेल्या विविध सामाजिक उपयोगी उपक्रमांची त्यांना माहिती दिली. साहेब फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेले कार्य तसेच रेणुका देवस्थानाला देण्यात आलेल्या सिलेंडर किट भेट संदर्भात रवी कोटारगस्ती यांनी आभार व्यक्त केले. भावी काळातही साहेब फाउंडेशनच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम पार पडल्या जावेत, सौंदत्ती यात्रा काळात साहेब फाउंडेशनच्यावतीने चांगले उपक्रम भाविकांच्या सोयीसाठी उपक्रम हाती घेण्यात यावेत अशा शुभेच्छा कोटारगस्ती यांनी दिल्या. यावेळी देवस्थान समितीचे अन्य कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : साहेब फाउंडेशनच्या वतीने रेणुका देवस्थानाला ऑक्सीजन सिलेंडरची भेट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm