बेळगाव : बेळगाव स्मार्ट सिटी (Belgaum Smart City) योजनेत 2 ठिकाणी बहुमजली कार पार्किंगची तरतूद करण्यात आली आहे. पहिले रेल्वे फाटक देशमुख रोड आणि महांतेश नगर येथे कार पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेने निविदा मागविली आहे. बेळगाव शहरात वाहन पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटी योजना प्रयत्नशील आहे.
पहिल्या रेल्वे फाटकाजवळ येणाऱ्या बहुमजली कार पार्किंगमध्ये 130 पार करता येऊ शकतात. तर महांतेशनगर येथील कार पार्किंग मध्ये 116 कार पार्क करता येऊ शकतात, अशा प्रकारचे स्मार्ट सिटी योजनेचे नियोजन आहे. प्रत्येकी 4 मजली कार पार्किंग तळ उभारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेने नियोजन केले आहे. त्यासाठी निविदा मागविली आहे. या निविदांना कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील कार्यवाही अवलंबून राहणार आहे.