बेळगाव : जनसेवेसाठी Google Play मध्ये 'बेळगाव सिटीझन ॲप'

बेळगाव : जनसेवेसाठी Google Play मध्ये 'बेळगाव सिटीझन ॲप'

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने (Belgaum Smart City Limited - BSCL) Google Play ( गुगल प्ले) मध्ये 'बेळगाव सिटीझन ॲप' जनसेवेसाठी तैनात केले असून या ॲपचा बेळगावकरांनी पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहनही केले आहे. बेळगाव सिटीझन ॲपवर शहर प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या स्मार्ट उपायांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. शहरवासीयांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी हा ॲप हा अत्यंत जलद आणि सोपा मार्ग असणार आहे. या ॲपद्वारे कोणत्याही वेळी नागरिक आपल्या तक्रारी मांडू शकतात तसेच तक्रारींबाबत जाणून घेऊ शकतात.
शहर प्राधिकरणाने नागरिकांच्या हितासाठी जे अनेक उपाय उपलब्ध करून दिले आहेत त्यांची इतंभूत माहिती या ॲपवर मिळू शकणार आहे. याखेरीज यामधील एसओएस वैशिष्ट्यद्वारे गरज पडेल तेंव्हा पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, महिला आपत्कालीन स्थिती आदीं संदर्भात मदत मिळू शकतात. त्याप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने अद्ययावत केलेल्या ताज्या बातम्या, घटना, हवामान आणि नजीकचे प्रमुख स्थळे याबाबतची माहिती बेळगावकरांसाठी या ॲपवर उपलब्ध असणार आहे.
Belgaum Smart City Limited Belgaum Smart City Has Deployed My Belgaum Citizen App in the Google Play , Citizens of Belgaum are Advised to make use of it. Belgaum Smart City Working Towards Better Urban Living .
माञ यामध्ये अनेक प्रकारच्या चुका आढळून आलेल्या आहेत. ॲपवर माहितीसीठी अनेक चेक्स पास झालेले नाहीत. ॲपवर माहिती भरताना व लोकेशन सर्च करताना अनेक प्राॅब्लम आढळलेले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जनसेवेसाठी Google Play मध्ये 'बेळगाव सिटीझन ॲप'

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm