बेळगाव : दुचाकीत लपून बसला होता साप; पाहा सर्पमित्राने कसा पकडला साप Video अनर्थ टळला...

बेळगाव : दुचाकीत लपून बसला होता साप;
पाहा सर्पमित्राने कसा पकडला साप Video अनर्थ टळला...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : म्हणतात ना सापाला अनेक घर असतात तसाच काहीसा प्रकार बेळगावधील वडगाव भागात घडला. दुचाकीमध्ये साप घुसला होता. दुचाकीत साप घुसल्याने लक्षात आल्यानंतर सर्पमित्र राम पाटील याला पाचारण करण्यात आले. त्यानंतर गाडी खोलून निसर्ग मित्रांनी साप पकडला आणि त्याला निसर्गात केला मुक्त केले. गाडीत घुसलेल्या या सापाला बाहेर काढण्यासाठी जिगरीचे प्रयत्न लागले. तोपर्यंत सर्वांचीच बोबडी वळाली होती. सापाचा धोका फक्त जंगलात किंवा शेतातच आहे असे नाही. सापाचा धोका दुचाकीमुळेही उदभवू शकतो. चारा आणण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी शेतात नेऊन उभी केलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये किंवा हेडलाईट कव्हरमध्ये साप उष्णतेसाठी आश्रय घेतात. त्यामुळे शेतात दुचाकी नेत असाल तर सावधानता बाळगली पाहिजेत. वडगावमध्ये अशीच घटना घडली आहे. अखेर साप बाहेर काढून त्यास निसर्गात मुक्त करण्यात आले.
एका दुचाकी वाहनात साप शिरला होता. मालकाने दक्षता घेतल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सर्पमित्र रामा पाटील यांनी व्यवस्थितपणे सापाला बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळला. अनेक शेतकरी आपली दुचाकी घेऊन शेतात वैरण आणण्यासाठी जातात. अशावेळी दुचाकीत साप बसू शकतो. दुचाकी सुरु करण्याआधी विशेष काळजी घ्यावी. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्याआहेत. - रामा पाटील, सर्पमित्र. संपर्क - 9620200707
पावसाळ्यात जमीन ओली असते. त्या काळात सापांना उष्णता हवी असते. दुचाकीच्या इंजिनमुळे त्यांना ती उष्णता मिळते. त्यामुळे साप दुचाकीचा आश्रय घेतात. यापूर्वी रस्त्याशेजारी लावलेल्या दुचाकीत साप लपल्याच्या आणि दुचाकी सुरु होऊन काही अंतर गेल्यामुळे इंजिन तापल्यामुळे अतिउष्णतेने साप बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीत लपलेल्या सापामुळे दुहेरी धोका आहे. एक तर साप दंश करू शकतो. साप पाहिल्यानंतर घाबरून अपघात होऊ शकतो.


खुप वेळा, दुचाकी, शेतात-रानात उभी केली असेल तर ती सुरु करण्यापूर्वी एकदा तपासणी करावी. इंजिनच्यावरची मोकळी जागा, दिव्यावरची मोकळी जागा तपासावी, त्यानंतर दुचाकीवर आरूड व्हावे. गरज म्हणून शेतात दुचाकीवरून जाणारे अनेक शेतकरी आहेत. विशेषता वैरण, चारा आणण्यासाठी दुचाकीचा वापर केला जातो. या दुचाकीमध्ये साप आश्रय घेऊ शकतो. विशेषता इंजिन आणि पेट्रोल टाकीच्या मधल्या मोकळ्या जागेत, समोरचा दिवा आणि स्पीडोमीटरच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत, कधीकधी साईट बॉक्‍समध्ये साप लपून बसतात.


घराभोवती अस्वच्छता, अडगळीच्या ठिकाणांमुळे सापांचा वापर वाढतो. पावसाळ्यात जुन ते ऑक्‍टोंबर दरम्यान सर्पदंशाच्या घटना वाढतात. शेतातील चिखलात, पाण्यात सापांवर पाय पडल्यामुळे साप दंश करतात. त्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गवत काढताना कालजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी शेतात.जादाना घणबूट वापरणे, बॅटरी घेऊन जाणे, घराभोवती थिमेट स्प्रे मारणे, दुचाकीत, चारचाकीत साप हा चुकून शिरतो. त्यामुळे अर्धा मीनीट गाडी सुरु करून पाहणे गरजेचे आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दुचाकीत लपून बसला होता साप; पाहा सर्पमित्राने कसा पकडला साप Video अनर्थ टळला...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm