बेळगाव : शिवस्मारक चौकात झळकला नामफलक - राजा श्री शिव छत्रपती चौक

बेळगाव : शिवस्मारक चौकात झळकला नामफलक - राजा श्री शिव छत्रपती चौक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर स्टेशनरोडवरील शिवस्मारक चौकातील नामफलक मोडकळीस आला होता. या फलकाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांतून केली जात होती. खानापुरातील राजा शिवछत्रपती चौकात बसवण्यात आलेला नामफलक मोडून वाकला होता. याबाबत वृत्तपञ तसेच सोशल मीडियावर बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत अवघ्या दोन दिवसात शहरातील शिवप्रेमी तरुणांनी व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून नवा नामफलक उभा केला आहे. शहराचे मुख्य चौक असलेल्या शिवस्मारक चौकात नगर पंचायतीच्या वतीने नामफलक उभा करण्यात आला होता. हा नामफलक पूर्ण वाकून मोडकळीस आला होता.
भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी शहरातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्या सहकार्यातून नवीन नामफलक बसविला. या नामफलकाचे शुक्रवारी फलकाचे अनावरण करण्यात आले. नगरसेवक नारायण ओगले, भाजपचे प्रसिद्धी प्रमुख राजू रायका यांच्या हस्ते नामफलकाची पूजा करण्यात आली. पंडित ओगले व राज गावडे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला. खानापूर शहराच्या मुख्य चौकात शिवस्मारकाची उभारणी केल्यानंतर या चौकाचे शिवछत्रपती चौक असे नामकरण करण्यात आले होते. नगरपंचायतीने तीन भाषेतील फलक उभारला होता. अखेर शिवप्रेमींच्या त्या मागणीला यश आले आहे.
नामफलक तयार करण्यासाठी राजू गावडे, साई ओगले, किरण तुडवेकर, संजय मयेकर, लक्ष्मण येळ्ळूरकर यांनी विशेष प्रयत्न केले. या अनावरण सोहळाला नगरसेवक विनायक कलाल, नितीन पाटील, विशाल सावंत, दत्ता वंजारे, ज्ञानेश्वर देवलतकर, किरण अष्टेकर, लोकेश कलबुर्गी, विशाल कलबुर्गी, अनंत सडेकर, गौतम जाणवेकर आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शिवस्मारक चौकात झळकला नामफलक - राजा श्री शिव छत्रपती चौक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm