राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले PHOTOS

राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले PHOTOS

belgavkar.com | belgaum | belgavkar

1,200 खांब जमिनीत 100 फूट खाली असतील. त्यावर मंदिर

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मंदिराच्या कामाला गती मिळाली आहे. राममंदिराच्या पायासाठी 1,200 खांबांच्या निर्मितीचे काम 15 ऑक्टोबरच्या सुमारास सुरू होईल व जून 2021 पर्यंत पूर्ण होईल, असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले आहे. या कामानंतर पायावरील कामाला सुरुवात होईल. त्यावर राफ्टचा प्लॅटफॉर्म बनेल आणि मग त्यावर 6 फूट उंच ढाचा. या ढाच्यावर मंदिराची निर्मिती होईल.
मंदिराच्या पायासाठी लागणाऱ्या कोरीव नक्षीदार खांबांचे मंदिर परिसरात आगमन होत आहे. कारखान्याच्या वर्कशॉपमधून हे खांब मंदिर परिसरात क्रेनच्या सहाय्याने आणले जात आहेत. वैदीक रिती-रिवाजाच्या पूजनानंतरच हे कोरीव व आकर्षक नक्षीकाम केलेले खांब मंदिर परिसरात आणण्यात आले आहेत. मंदिरा निर्माण ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती आहे. जेथे राममंदिर होणार आहे तेथे टेस्ट पिलरचे काम होत आहे. यासाठी 3 पिलरची निर्मिती केली जात असून, त्याच्या चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 ऑक्टोबरपासून इतर खांबांची निर्मिती होईल.
चाचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर राममंदिर बांधकामाला वेग येईल आणि जून 2021 पर्यंत मंदिरासाठी आवश्यक 1,200 खांब बनवले जातील. पाया तयार झाल्यावर मंदिराच्या वरच्या भागाचे काम सुरू होईल. 2022 मध्ये राम जन्मभूमी मंदिराच्या एका तळाचे कार्य पूर्ण होईल, असे समजते. 1,200 खांब जमिनीत 100 फूट खाली असतील. त्यावर मंदिर उभे राहील. 1,200 खांबांवर 06 फूट उंचीचा ढाचा असेल व त्यावर मंदिर उभे राहील. खांबांच्या चाचणीचे पूर्ण काम आयआयटी (रुरकी) आणि आयआयटीच्या (चेन्नई) देखरेखीत केले जात आहे. त्यात जमिनीची मजबुती आणि भार सहन करण्याची क्षमताही तपासली जात आहे. पाया तयार केल्यानंतर मंदिराचा वरचा भाग तयार केला जाईल. जे खांब बनवले जाणार आहेत. त्याच्या काठाकाठाला सुरक्षा भिंतही उभी केली जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले PHOTOS
1,200 खांब जमिनीत 100 फूट खाली असतील. त्यावर मंदिर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm