अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल
https://tinyurl.com/26qx7t6a

अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल

belgavkar.com | belgaum | belgavkar

रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार पीठ, तांदूळ आणि डाळी

Govt in talks to sell Bharat brand food through Reliance Retail outlets

Bharat Brand Product : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून सर्व सामान्यांना परवडतील अशा कमी कमीत पीठ, तांदुळ आणि डाळींची विक्री सुरु केली. भारत ब्रँड (Bharat Brand) नावाने स्वस्त पीठ, तांदुळ आणि डाळी विकण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वस्त रेशनचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवा यासाठी केंद्र सरकारकडून हे सामना रिलेटन चेनच्या माध्यमातून विकण्याचा विचार केला जात आहे.  यासाठी सरकारकडून आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स समुहासोबत चर्चा सुरु आहे. 
रिपोर्टनुसार भारत ब्रँडचा खप वाढवण्यासाठी रिटेल चेनच्या माध्यमातून गावा-गावात शहरा-शहरात सामान पोहोचवलं जाणार आहे. यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल्सचा पर्याय विचार करण्यात आला आहे.  याआधीही भारत ब्रँडचा तांदूळ, डाळी आणि पीठ रिलायन्सच्या JioMart, Amazon आणि BigBasket यासह विविध ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. सरकारने या कंपन्यांबरोबर तात्पूरता करार केला होता. आता केंद्र सरकारकडून रिटेल कंपन्यांबरोबर दीर्घकालीन करार करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून भारत ब्रँडचं किराणा सामान विकलं जाणार आहे. हा करार झाल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारत ब्रँडचं स्वस्त किराणा सामन पोहोचणार आहे. 
रिटेल कंपन्यांबरोबर दिर्घकालीन करार : खासगी कंपन्यांबरोबर सरकार दिर्घकालीन करार करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन भारत ब्रँडच्या प्रोडक्टची अधिक विक्री होऊ शकेल. यासाठी रिलायन्स रिटेलबरोबरच डीमार्ट आणि अन्य काही किरोकळ सामन विक्रेत्यांशीही केंद्र सरकारची चर्चा सुरु आहे. रिलायन्स रिटेल किंवा डि मार्टने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
देशभरात रिलायन्स रिटेल स्टोर्सचं जाळ पसरलं आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात जवळपास 18 हजाराहून अधिक रिलायन्स रिटेल स्टोर्स आहेत. याशिवाय जिओ मार्टसारखं ऑनलाईन प्लॅटफॉर्मही आहे. त्यामुळे हा करार झाल्यास देशातील कोपऱ्या-कोपऱ्यात भारत ब्रँडचे स्वस्त तांदुळ, पीठ, डाळ यासारखं धान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे. 

Govt in talks to sell Bharat brand food through Reliance Retail outlets

Govt in talks with Reliance Retail to sell Bharat products

अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल
रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार पीठ, तांदूळ आणि डाळी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm