रेल्वेतील चादर, ब्लँकेट किती दिवसांतून धुतले जातात?

रेल्वेतील चादर, ब्लँकेट किती दिवसांतून धुतले जातात?

belgavkar.com | belgaum | belgavkar

RTI मधून समोर आली धक्कादायक माहिती

Woollen blankets washed once or twice a month by Indian Railways - RTI

Indian Railway SHOCKER : Report By RTI : भारतीय रेल्वेमधून प्रवास करताना एसी डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिली जाणारी ब्लँकेट्स प्रत्यक्षात किती वेळा धुतली जातात? एका RTI अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानुसार ब्लँकेट्स 'कमीत कमी महिन्यातून एकदा आणि शक्य असल्यास दोनदा धुतली' जातात, परंतु हा निर्णय लॉजिस्टिकच्या सुविधांवर अवलंबून असतो.
रोज प्रवाशांची सेवा करणाऱ्या जवळपास 20 ट्रेनमधील हाऊसकीपिंग स्टाफशी संवाद साधल्यावर असं आढळलं की, ब्लँकेट्स मासिक स्वरूपातच धुतली जातात. 'जर ब्लॅकेट्सवर वास येत असेल किंवा ती घाण झाली असेल तरच ती धुण्यासाठी पाठवली जातात,' असं अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
रेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये काम करणाऱ्या हाऊसकीपिंग स्टाफच्या मते, ब्लॅकेट्सची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कोणतंही नियमित निरीक्षण नाही. 'काही प्रसंगी, जर प्रवाशांनी तक्रार केली तरच आम्ही तत्काळ स्वच्छ ब्लँकेट देतो,' असं एक कर्मचाऱ्याने सांगितलं.

माजी रेल्वे अधिकारी यांनी ब्लॅकेट्सच्या वापरावरच प्रश्न उपस्थित केला आहे. 'ब्लँकेट्स जड असतात आणि त्यांची योग्य साफसफाई करणे अवघड आहे. रेल्वेने यापुढे या ब्लँकेट्सचा वापर थांबवावा,' असं त्यांचं मत आहे. सध्या भारतीय रेल्वेकडे 46 विभागीय लॉन्ड्रीज आणि 25 BOOT लॉन्ड्रीज आहेत. विभागीय लॉन्ड्रीज म्हणजे रेल्वेची जमीन आणि यंत्रे, परंतु कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाते. BOOT लॉन्ड्रीजमध्ये मात्र उपकरणं आणि कर्मचाऱ्यांचा मालक खाजगी ठेकेदार असतो.

woollen blankets are washed once a month

Woollen blankets washed once or twice a month by Indian Railways RTI

Indian Railways Blanket Hygiene

woollen blankets are washed once a month

रेल्वेतील चादर, ब्लँकेट किती दिवसांतून धुतले जातात?
RTI मधून समोर आली धक्कादायक माहिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm