बेळगाव : अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, टोळी युद्ध होतील...

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाकणूक सांगताना काय म्हणाले महाराज?

बेळगाव—belgavkar—belgaum : हालसिद्धनाथ महाराज की जय... चांगभलं... च्या जयघोषात आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारी पहाटे सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक कथन झाली. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची गर्दी होती. शुक्रवारी कुर्ली-आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणुकीने खडक मंदिरात आणण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मान्यवरांच्या उपस्थितीत कर बांधली. तेव्हापासून नियमित सकाळी सात वाजता व रात्री सात वाजता आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.



पृथ्वीवरून औषधी वनस्पती नष्ट होईल
दीड महिन्याचे कडधान्याचे पीक येईल
सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल
महाराष्ट्र राज्यात नदी जोड प्रकल्प येईल
दुष्काळी भागाचे नंदनवन होईल
शर्यतीतील बसव्या तुम्हाला शाप देईल
अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, टोळी युद्ध होतील
रोज रात्री ढोल जागर (वालंग), पहाटे पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. रविवारी पहाटे डोणे यांची पहिली भाकणूक झाली. यात्रेचा काल मुख्य दिवस असल्याने सकाळी सात वाजता मानकरी, पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरती करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनेक भाविकांनी दंडवत घातले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी आप्पाचीवाडी, कुर्ली येथील भाविकांनी गर्दी केली होती. रात्री ढोल जागर वालंग, पालखी सबिना, पहाटे सिद्धार्थ डोणे यांची मुख्य भाकणूक झाली. भाकणूकीत सिद्धार्थ डोणे यांनी विविध भाकिते केली. भाकणूक ऐकण्यासाठी रात्रीपासून भाविकांनी जागा धरून ठेवली होती. पहाटे भाकणूक झाल्यानंतर भाविक परतीच्या मार्गाला लागले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अन्नछत्र यांच्या वतीने यात्रा काळात भाविकांना महाप्रसादाची सोय केली होती. सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्यसेवा देण्यात आली. यात्रा कमिटी देवस्थान कमिटी व ग्रामपंचायत यांच्यावतीने ग्रामस्थांच्या सोयीसाठी अनेक उपाय योजना राबवल्या होत्या यामध्ये पार्किंग, पिण्याचे पाणी, भाविकांना राहण्यासाठी सोय करण्यात आली होती. मंदिर परिसरात नारळ, साखर, कापूर यासह खेळणी, पाळणे, हॉटेल, भेळ आदीचे स्टॉल लावण्यात आले होते.
यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण होत असल्याने व हालसिद्धनाथ देवस्थान समितीच्या वतीने चांगल्या प्रतीची हळदच विक्री करावी, असा आदेश दिल्याने येथील व्यापाऱ्यांनी सुमारे दोन टन हळद विक्री केली आहे. मंदिर व परिसरात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण झाल्याने परिसर पिवळा धमक झाला होता.

belgaum Halsiddhanath Yatra Appachiwadi Nipani Aappachiwadi Kurli belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Halsiddhanath Yatra Appachiwadi belgaum

बेळगाव : अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल, टोळी युद्ध होतील...
भाकणूक सांगताना काय म्हणाले महाराज?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm