'डबल महाराष्ट्र केसरी' पैलवानाच्या घरी छापा

'डबल महाराष्ट्र केसरी' पैलवानाच्या घरी छापा

belgavkar.com | belgaum | belgavkar

भाजप नेत्याशी खास कनेक्शन

महाराष्ट्र : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ⁠महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.
राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार अमोल बालवडकर यांच्या सासऱ्यांच्या घरी म्हणजेच महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
अमोल बालवडकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. उमेदवारी न दिल्यास बंडखोरीच्या तयारीत असल्याचेही संकेत त्यांनी दिले होते. अशातच आता त्यांच्या सासऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Pune Kothrud IT Raid on Hind Kesri Abhijeet Katke brother in law of Amol balwadkar

Income Tax Department raids Hindkesari wrestler Abhijit Katke

Abhijeet Katke Maharashtra kesari 2017

'डबल महाराष्ट्र केसरी' पैलवानाच्या घरी छापा
भाजप नेत्याशी खास कनेक्शन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm