बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये ध्वज फडकवा

बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये ध्वज फडकवा

belgavkar.com | belgaum | belgavkar

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन

बेळगाव—belgavkar—belgaum : शिक्षण खात्याने 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करा. शाळांमध्ये ध्वज फडकवा, असा आदेश काढला आहे. परंतु यामध्ये राष्ट्रध्वज की लाल-पिवळा याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु शिक्षकांना लाल-पिवळा झेंडा फडकवण्याची तोंडी सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्रक जारी केलेआहे. यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठीच सरकारकडून अनधिकृत लाल-पिवळ्याचा अट्टाहास धरण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्य घटनेत कोणत्याही राज्यासाठी स्वतंत्र ध्वजाची तरतूद करण्यात आलेली नाही. तरीदेखील कर्नाटकाकडून लाल पिवळ्याचा दुराग्रह धरला जातो. यातून राज्यातील अन्य भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतो. राज्य घटनेत ध्वज म्हणून केवळ तिरंग्याला मान्यता देण्यात आली आहे. पण, कर्नाटक सरकारने सर्व शाळांतून ध्वज फडकवा, असे परिपत्रक काढले आहे. यामुळे शिक्षक संभ्रमात सापडले आहेत.
शिक्षण खात्याने काढलेल्या परिपत्रकात फक्त ध्वज फडकवा असा उलेख केला आहे. तिरंगा की, लाल-पिवळा असा कोणताच उल्लेख नाही. मात्र लाल-पिवळा फडकावण्याची तोंडी सूचना देण्यात आल्याने शिक्षक अडचणीत सापडले आहेत. राज्योत्सवाचीही सक्ती : राज्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांतून 69 वा कन्नड राज्योत्सव दिन साजरा करावा, अशी सक्ती करण्यात आली आहे. राज्योत्सवदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करा, असेही सूचित केले आहे.

Belgaum Department of Education to celebrate Karnataka Rajyotsav Day on 1st November belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Department of Education to celebrate Karnataka Rajyotsav Day on 1st November

Department of Education to celebrate Karnataka Rajyotsav Day on 1st November belgaum

बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये ध्वज फडकवा
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm